MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Sports
  • Cricket
  • MS Dhoni : धोनीचा आयपीएलला गुडबाय; पण चेन्नई सुपर किंग्ससोबत नवा प्रवास

MS Dhoni : धोनीचा आयपीएलला गुडबाय; पण चेन्नई सुपर किंग्ससोबत नवा प्रवास

आयपीएल 2027 रिटेन्शनच्या डेडलाईनच्या दिवशी एमएस धोनीने खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केली आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा मेंटॉर म्हणून तो आता नवी इनिंग सुरू करणार आहे.

3 Min read
Author : Karishma R
Published : Nov 17 2026, 04:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
आयपीएलला धोनीचा गुडबाय
Image Credit : Getty

आयपीएलला धोनीचा गुडबाय

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधील खेळाडू म्हणून आपल्या करिअरला मंगळवारी पूर्णविराम दिला. आयपीएल 2027 सीझनसाठी खेळाडूंच्या रिटेन्शनच्या डेडलाईनच्या दिवशी ही मोठी घोषणा झाली. खेळाडू म्हणून निवृत्त झाला असला, तरी धोनी चेन्नईची साथ सोडणार नाही. आयपीएल 2027 पासून तो चेन्नई सुपर किंग्सचा टीम मेंटॉर म्हणून नवी जबाबदारी सांभाळणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून वारंवार दुखापतींचा सामना करावा लागत असल्यामुळे 45 वर्षीय धोनीचा मैदानावरचा वावर कमी झाला होता. यामुळे तो खेळाडू म्हणून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. मात्र, चेन्नईने जारी केलेल्या अधिकृत माहितीत या सुपरस्टार विकेटकीपर फलंदाजाकडून कोणतेही वैयक्तिक विधान आलेले नाही. ऑगस्ट 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने आता आयपीएलच्या मैदानालाही खेळाडू म्हणून गुडबाय केले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
धोनीशिवाय सीएसके नाही: एन. श्रीनिवासन
Image Credit : Getty

धोनीशिवाय सीएसके नाही: एन. श्रीनिवासन

धोनीच्या नव्या भूमिकेवर चेन्नई सुपर किंग्सचे मालक एन. श्रीनिवासन यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. "एमएस धोनीशिवाय सीएसके नाही. जवळपास दोन दशके विजय आणि पराभव अशा सर्वच परिस्थितीत आम्ही एकत्र चाललो आणि एकत्र वाढलो," असे त्यांनी सांगितले. आमच्यातील नाते इतके घट्ट असण्याचे कारण म्हणजे एकमेकांवरील विश्वास असल्याचे श्रीनिवासन म्हणाले.

"आम्ही कधीही एकमेकांच्या हेतूंवर शंका घेतली नाही. 2008 मध्ये धोनी सीएसकेमध्ये असावा असा आग्रह मीच धरला होता. माझ्या आयुष्यातील तो सर्वोत्तम निर्णय होता. त्याने फ्रँचायझीसाठी मिळवलेल्या यशानेच नव्हे, तर तो एक उत्तम माणूस असल्यामुळे माझा निर्णय योग्य ठरला. धोनी कायमचा आमच्या ओळखीचा एक भाग राहील. चेन्नई नेहमीच त्याचे स्वतःचे घर असेल," असे श्रीनिवासन यांनी गौरवोद्गार काढले.

Related Articles

Related image1
MS Dhoni Birthday : धोनी ब्रँड एंडोर्समेंटमधून किती कमावतो? ब्रँड व्हॅल्यू वाचून बसेल धक्का
35
तरुण खेळाडूंना धोनीचे मार्गदर्शन: रूपा गुरुनाथ
Image Credit : x

तरुण खेळाडूंना धोनीचे मार्गदर्शन: रूपा गुरुनाथ

फ्रँचायझीच्या सहमालक आणि श्रीनिवासन यांची कन्या रूपा गुरुनाथ म्हणाल्या की, धोनीसारखा खेळाडू आयुष्यात एकदाच येतो. सीएसकेच्या सुरुवातीपासून संघासोबत राहून या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी भक्कम पाया रचल्याबद्दल आम्ही धोनीचे कायम ऋणी राहू, असे त्यांनी सांगितले.

"मैदानात आणि मैदानाबाहेर त्याने आम्हाला जे दिले त्याची किंमत पैशात करता येणार नाही. त्याचे नेतृत्व, नम्रता, वचनबद्धता आणि करोडो चाहत्यांशी जोडले जाण्याची पद्धत खूप खास आहे. संघ सध्या संक्रमणाच्या टप्प्यातून जात असताना मेंटॉर म्हणून धोनीचा अनुभव आणि कौशल्ये आमच्यासाठी अमूल्य आहेत. संघातील अनेक युवा खेळाडूंना घडवण्यासाठी त्याचे मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरेल," असे रूपा गुरुनाथ यांनी स्पष्ट केले.

45
चेन्नईचाच एक भाग बनला: कासी विश्वनाथन
Image Credit : X/@CricCrazyJohns

चेन्नईचाच एक भाग बनला: कासी विश्वनाथन

चेन्नई सुपर किंग्सचे व्यवस्थापकीय संचालक कासी विश्वनाथन म्हणाले की, एक क्रिकेटर म्हणून धोनीने मिळवलेले यश प्रत्येक चाहत्याच्या मनात कोरले गेले आहे. "धोनीला खऱ्या अर्थाने खास बनवणारी गोष्ट म्हणजे तो चेन्नई शहराशी एकरूप झाला. त्याने या शहरावर प्रेम केले आणि शहरानेही त्याला आपले मानून जवळ केले. जेव्हा आपण मागे वळून बघतो, तेव्हा फक्त ट्रॉफीच नाही, तर आपण त्या कशा जिंकल्या हेही लक्षात राहते. तोच त्याचा खरा वारसा आहे. मैदानावर त्याला पिवळ्या जर्सीमध्ये पाहणे आम्ही मिस करू. पण, तो आमच्या खेळाडूंना सातत्याने मार्गदर्शन करेल याचा आनंद आहे," असे कासी विश्वनाथन म्हणाले.

55
विक्रमांचा बादशाह.. 'थाला'ची दुर्मिळ कामगिरी
Image Credit : Instagram/chennaiipl

विक्रमांचा बादशाह.. 'थाला'ची दुर्मिळ कामगिरी

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी धोनी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला पाच आयपीएल जेतेपदे मिळवून दिली आहेत. कोणत्याही कर्णधारासाठी ही सर्वाधिक संख्या आहे. यासोबतच त्याने दोन चॅम्पियन्स लीग टी-20 विजेतेपदेही जिंकली आहेत. केवळ कर्णधार म्हणूनच नाही, तर लीगच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्येही त्याची गणना होते. सीएसकेसाठी 272 सामने खेळून सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आणि 5,314 धावांसह संघासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने विक्रम रचला आहे.

शेवटच्या चेंडूवरील फिनिशिंग, हेलिकॉप्टर शॉट्स, विजेच्या वेगाने स्टंपिंग आणि दबावातही बर्फासारखे शांत राहण्याची त्याची वृत्ती करोडो चाहत्यांना विश्वास देत आली. आता मेंटॉर म्हणून धोनीच्या नव्या इनिंगची चेन्नईचा संघ उत्सुकतेने वाट पाहत आहे.

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
क्रिकेट बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Dhoni Retires: पिवळ्या जर्सीतील ऐतिहासिक प्रवासाचा शेवट, एमएस धोनीची आयपीएलमधून निवृत्ती; सीएसकेमध्ये नवी जबाबदारी
Recommended image2
Lionel Messi: वॉल्टर सॅम्युअल अर्जेंटिना टीम सोडणार, 2030 वर्ल्ड कपमध्ये मेस्सी अर्जेंटिनाचा कोचिंग स्टाफ असणार? लिओनेल स्कालोनी यांनी दिले उत्तर
Recommended image3
IPL 2027 Retention : आयपीएल 2027 रिटेन्शनमध्ये या 5 दिग्गजांना बसू शकतो धक्का
Recommended image4
IPL 2027 Retention : आयपीएल २०२७ रिटेंशन: धोनी सीएसकेमध्ये राहणार का? डेडलाईनच्या दिवशी सस्पेन्स कायम
Recommended image5
Sachin Tendulkar : एमसीए म्युझियममध्ये सचिन तेंडुलकरच्या 'बॅटोग्राफी' प्रदर्शनाचं उद्घाटन
Related Stories
Recommended image1
MS Dhoni Birthday : धोनी ब्रँड एंडोर्समेंटमधून किती कमावतो? ब्रँड व्हॅल्यू वाचून बसेल धक्का
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved