Bangladesh Refuses to Play T20 World Cup in India : सुरक्षेच्या कारणास्तव 2026 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर बांगलादेश क्रिकेट बोर्ड ठाम आहे.
Bangladesh Refuses to Play T20 World Cup in India : आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर बांगलादेश क्रिकेट बोर्ड ठाम आहे. शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत, 2026 च्या T20 वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. सुरक्षेच्या कारणास्तव वर्ल्ड कपचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवावेत, अशी अधिकृत विनंती BCB ने ICC कडे केली आहे. BCCI च्या सूचनांनंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला रिलीज केल्यानंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. या संकटावर ICC ने BCB सोबत अनेक बैठका घेतल्या. मात्र, BCB ने आपली भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. अधिक अंतर्गत चर्चेनंतर ICC पुढील आठवड्यात अंतिम निर्णय जाहीर करेल.
बांगलादेश आयर्लंडसोबत ग्रुपची अदलाबदल करू शकतो, जेणेकरून त्यांना त्यांचे सर्व ग्रुप सामने श्रीलंकेत खेळता येतील, असा प्रस्ताव BCB ने दिला आहे. या प्रस्तावानुसार, बांगलादेश ग्रुप C चा भाग बनेल आणि आयर्लंडला ग्रुप B मध्ये हलवले जाईल. आयर्लंड आपले ग्रुप स्टेजचे सामने कोलंबो आणि पल्लेकेले येथे खेळत आहे.
संघ, बांगलादेशी चाहते, मीडिया आणि इतर भागधारकांच्या सुरक्षेबद्दल बांगलादेश सरकारच्या चिंता आणि दृष्टिकोन बोर्डाने शेअर केला. ICC प्रतिनिधीमंडळात इव्हेंट्स अँड कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे जनरल मॅनेजर गौरव सक्सेना आणि इंटिग्रिटी युनिटचे जनरल मॅनेजर अँड्र्यू एफग्रेव्ह यांचा समावेश होता. गौरव सक्सेना यांना व्हिसा उशिरा मिळाल्याने ते बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे ते चर्चेत व्हर्च्युअली सहभागी झाले. अँड्र्यू एफग्रेव्ह बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. BCB कडून अध्यक्ष एमडी अमिनुल इस्लाम, उपाध्यक्ष एमडी शकावत होसेन, फारुख अहमद, क्रिकेट ऑपरेशन्स कमिटीचे संचालक आणि अध्यक्ष नझमुल अबेदीन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निजाम उद्दीन चौधरी हे उपस्थित होते.


