Asia Cup 2025 Ind vs Pak : मोठ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव एकदम फ्रेश मूडमध्ये दिसला. त्याने काय सांगितले?
Asia Cup 2025 Ind vs Pak : आशिया कपमध्ये पुन्हा एकदा हाय-व्होल्टेज सामना (asia cup live score) बघायला मिळणार आहे. निःसंशयपणे हे एक मोठे युद्ध आहे. सुपर फोरच्या मोठ्या लढतीत रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (india vs pakistan live) समोरासमोर येणार आहेत.
सामन्यापूर्वी सूर्य काय म्हणाला?
मोठ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव एकदम फ्रेश मूडमध्ये दिसला. तो म्हणाला, "जेव्हा मी मैदानात प्रवेश करतो आणि पाहतो की इतके लोक सामना पाहण्यासाठी आले आहेत, तेव्हा आम्ही स्वतःला त्याप्रमाणे तयार करतो. आम्ही आतापर्यंत तीन सामने खेळलो आहोत आणि जिंकलो आहोत. त्यामुळे आम्हाला प्रत्येक सामन्याचा विचार करायचा आहे. प्रत्येक सामना आमच्यासाठी एक नवीन आव्हान आहे. त्यामुळे संपूर्ण संघाचे लक्ष नेहमी क्रिकेटवर असते. आम्ही बाहेरील कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही. आम्ही फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहोत. नक्कीच विजयासाठी मैदानात उतरू आणि क्रिकेटचा आनंद घेऊ."
कर्णधार म्हणाला, "आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू सामन्याचे महत्त्व ओळखून तयारी करत आहे. सराव खूप चांगला झाला आहे. ज्याप्रमाणे इतर सामन्यांमध्ये संपूर्ण देशाने आम्हाला पाठिंबा दिला, तसाच या सामन्यातही द्यावा. आरामात बसा, रविवारचा सामना पाha. आम्ही त्याच उर्जेने मैदानात उतरू आणि विजयाची भेट देऊ."
विशेष म्हणजे, सूर्यकुमारने सध्या क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. याचे कारण म्हणजे ओमानविरुद्धचा सामना. तो सहसा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. पण अबू धाबीमध्ये ओमानविरुद्ध त्याने हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांना स्वतःच्या आधी फलंदाजीला पाठवले. कारण, सूर्याला नवीन खेळाडूंना संधी द्यायला आवडते.
कर्णधार फॉर्मात आहे
सामना संपल्यानंतरही त्याने मन जिंकले. ओमानच्या लढतीला सलाम करत तो खेळाडूंकडे गेला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. तसे, पहिल्या सामन्यात त्याने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध ७ धावा केल्या होत्या. पण गट फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध त्याने जबाबदारीने खेळी केली. त्याने ४७ धावांची नाबाद खेळी करून मैदान सोडले.
इतकेच नाही, तर सामना संपल्यानंतर हस्तांदोलन न करताच सूर्य-शिवम थेट डग-आऊटच्या दिशेने गेले. 'नो हँडशेक' आणि त्यांची देहबोली सांगत होती की, भारत जिंकायला आला आहे. चोख प्रत्युत्तरासह उच्च स्तरीय वृत्तीने संपूर्ण भारतीय संघाने मैदान सोडले. त्यानंतर 'नो हँडशेक' वाद शिगेला पोहोचला. त्याच पार्श्वभूमीवर भारत पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचा सामना करत आहे.
आज पत्रकार परिषदेतही सूर्याने एकदाही पाकिस्तानचे नाव घेतले नाही. यावरून स्पष्ट होते की, भारत आपल्या भूमिकेवरून जराही मागे हटलेला नाही.

