Arjun Tendulkar and Saaniya Chandok: अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या नात्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्या नात्याला अधिकृतता मिळाली.
मुंबई : अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या साखरपुड्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होत्या. मात्र या चर्चांना कोणताही अधिकृत दुजोरा नव्हता. अखेर एका व्हायरल व्हिडिओने सर्व संभ्रम दूर केला आणि अर्जुन-सानियाच्या नात्याला अधिकृतता मिळाली आहे.
व्हिडिओ झाला व्हायरल, आणि चर्चांना मिळाली दिशा
सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका खास कार्यक्रमात सानिया चंडोक दिसून आली. यावेळी तिच्यासोबत सचिन, अंजली आणि सारा तेंडुलकरही होते. त्यांच्या एकत्रित उपस्थितीने अर्जुन आणि सानियाच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं, असं बोललं जातं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
साखरपुडा गुपचूप, पण चर्चेला उधाण
अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा गुपचूप पार पडल्याचं बोललं जात होतं. यावर कोणतीही अधिकृत घोषणा नव्हती. त्यामुळे सानिया कोण आहे, ती काय करते याविषयी बऱ्याच जणांना उत्सुकता होती. काही वेळातच समोर आलं की, सानिया ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून ती स्वतः एक उद्योजिका आहे.
साराची मैत्रीण, आता वहिनी
सानिया ही सारा तेंडुलकरची जवळची मैत्रीण आहे. सारा तिच्यासोबतचे अनेक क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या सारा तिचं पिलेट्स अकादमीचं ब्रँड मुंबईत उघडत आहे. याच पिलेट्स अकादमीच्या उद्घाटन सोहळ्याला सारा, सचिन, अंजली आणि सानिया एकत्र दिसले. या प्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी उद्घाटन केलं आणि सानियालाही या खास क्षणी सहभागी करून घेतलं गेलं. त्यामुळेच अर्जुन-सानिया यांचं नातं आता केवळ चर्चा नसून वास्तव असल्याचं स्पष्ट झालं.
कुटुंबासोबतचा सानियाचा सहभाग म्हणजे संकेत!
तेंडुलकर कुटुंबियांच्या कार्यक्रमात सानियाची उपस्थिती ही एक साधी योगायोग नव्हे, तर कुटुंबाने तिला स्वीकारल्याचा एक ठोस इशारा मानला जातो. अर्जुन आणि सानियाच्या नात्यावर यामुळे अधिकृत शिक्कामोर्तब झालं असून, चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


