अभिषेक शर्मा कॅप्टन्सी न मिळाल्याने सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीम सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मुंबई आणि गुजरातसह अनेक टीम्स त्याला आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहेत. पण, हैदराबादच्या सीईओने या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.
बंगळुरू: २०२७ च्या आयपीएल (IPL) हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच ऑरेंज आर्मीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.
सनरायझर्स हैदराबादने २०२६ च्या आयपीएलमध्ये दमदार खेळ दाखवत तिसऱ्या क्रमांकावर प्ले-ऑफमध्ये धडक मारली होती. टीमने ग्रुप स्टेजमधील १४ मॅचेसपैकी ९ मध्ये विजय आणि ५ मध्ये पराभव पत्करून १८ पॉईंट्स मिळवले होते. पण, इशान किशनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हैदराबादला एलिमिनेटर मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता २० व्या सीझनसाठी टीम तयारी करत असतानाच, अभिषेक शर्मा फ्रँचायझीच्या मालकीण काव्या मारन यांच्यावर नाराज असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत.
सनरायझर्ससाठी अभिषेक शर्माची तुफानी खेळी:
हैदराबादची टीम १८ व्या सीझनमध्ये तगडी असूनही त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आणि ते साखळी फेरीतच बाहेर पडले. त्यानंतर पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑरेंज आर्मीने विकेटकीपर-बॅटर इशान किशनकडे कॅप्टन्सी सोपवली. अभिषेक शर्माने १९ व्या सीझनमध्ये हैदराबादला प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला होता. त्याने गेल्या सीझनमध्ये हैदराबादकडून १५ मॅचेस खेळताना १९८.५२ च्या स्ट्राईक रेटने ५६३ रन्स कुटले होते. यात १ शतक आणि ४ शानदार अर्धशतकांचा समावेश होता.
अभिषेक शर्मा हैदराबाद फ्रँचायझीवर का भडकला?
पॅट कमिन्स गेल्या सीझनमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट होताच, अभिषेक शर्माची नजर ऑरेंज आर्मीच्या कॅप्टन्सीवर होती. पण, सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने अभिषेकला डावलून इशान किशनच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ घातली. यामुळे अभिषेक शर्मा चांगलाच नाराज झाला. याच कारणामुळे तो आता ऑरेंज आर्मी सोडून दुसऱ्या टीमच्या शोधात असल्याचे बोलले जात आहे.
या चार टीम्सची अभिषेक शर्मावर नजर:
पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स टीम्स सनरायझर्स हैदराबादमधून जवळपास बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या अभिषेक शर्माला आपल्या गोटात सामील करण्यासाठी उत्सुक आहेत. एवढंच नाही, तर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीम्सही या डावखुऱ्या बॅटरला आपल्याकडे खेचण्यासाठी रणनीती आखत आहेत.
हैदराबादच्या सीईओने फेटाळल्या अफवा:
अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबाद सोडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताच, हैदराबादच्या सीईओने यावर स्पष्टीकरण दिले आहे. या सर्व बातम्या खोट्या असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सध्या तरी या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
