सार

नेपाळमध्ये वेस्ट इंडिज अ संघाचे अतिशय विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. तसेच या गोष्टीचा व्हिडीओ देखील काढण्यात आला आहे आणि हा व्हिडीओ काही वेळातच तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

नेपाळमध्ये वेस्ट इंडिज अ संघाचे अतिशय विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. तसेच या गोष्टीचा व्हिडीओ देखील काढण्यात आला आहे आणि हा व्हिडीओ काही वेळातच तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

ना मोठा तामझाम ना पोलिसांची सुरक्षा...सध्या क्रिकेटमध्ये आयपीएल २०२४ थरार सुरू आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष फक्त आयपीएलवर आहे. पण क्रिकेट जगतात आंतरराष्ट्रीय मालिकादेखील खेळल्या जात आहेत. पण आयपीएलच्या लोकप्रियतेमुळे त्या मालिकांकडे कोणाचेही फारसे लक्ष नाही.पण दुसरीकडे नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडिज टी २० खेळवली जात आहे. यासाठी वेस्ट इंडिज अ संघ नेपाळ मध्ये दाखल झाला असून त्यांच्या सोबत एक विचित्र प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओमध्ये वेस्ट इंडिजचा अ संघ नेपाळ दौऱ्यावर पोहोचल्याचे दिसत आहे. नेपाळमध्ये वेस्ट इंडिज अ संघाचे अतिशय विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणार आहे. वास्तविक, वेस्ट इंडिज अ संघाचे खेळाडू स्वतः त्यांचे सामान एका लोडरमध्ये लोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, वेस्ट इंडिजचे खेळाडू विमानतळावरून बाहेर पडतात आणि नंतर त्यांचे सामान एका लोडरवर चढवतात. लोडरवर सामान चढवल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना एका बसमधून हॉटेलमध्ये नेण्यात येते. पण संघासाठी उपलब्ध असलेली बस अतिशय साधी आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासाठी अशी बस तुम्ही क्वचितच पाहिली असेल.

नेपाळ-वेस्ट इंडिज मध्ये पाच टी २० सामने :

नेपाळ आणि वेस्ट इंडिज अ यांच्यात ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला शनिवारी २७ एप्रिल सुरुवात होणार आहे, तर शेवटचा सामना ४ मे रोजी होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर खेळवले जाणार आहेत.