Vinayak Raut Daughter-In-Law Girija Raut Allegations : शिवसेना मंत्री आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्या कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. मासिक पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या, गोमुत्र प्यायला दिलं तसंच केस कापल्याचा गंभीर आरोप तिने पती गितेश राऊतांसह ९ जणांवर केले आहेत. 

मुंबई : उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्या सुनेकडून अतिशय गंभीर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विनायक राऊत यांच्यांसह त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि संपूर्ण कुटुंबाविरोधात सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यात कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक तसंच मानसिक आणि शारीरिक छळ तसंच जादूटोणा केल्याप्रकरणी हा गुन्हा कुटुंबावर दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. राऊत कुटुंबासह अघोरी प्रकारांवविरोधात तीन भोंदू बाबांविरोधातही तक्रार करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विनायक राऊतांचा मुलगा गितेश राऊतसह इतर कुटुंबियांवर गंभीर आरोप

विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत हे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक आहेत. गितेश यांच्यासह राऊत कुटुंबातील ९ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पती गितेश राऊत आणि सासू शामल राऊत हे दोघे मासिक पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घेण्यास भाग पाडत होते. मासिक पाळी दर महिन्याला पुढे जात असल्याने अतिशय त्रास होत होता, डॉक्टरांनी गोळ्या न देण्याचं पतीला सांगितलं, मात्र त्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ केली, असे खळबळजनक आरोप गिरीजा राऊत यांनी पोलिस तक्रारीत केली आहेत. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत फसवणूक, धमकी, विवाहितेवर क्रूरतेबाबत राऊत कुटुंबावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जादूटोणा, अघोरी कृत्यांचा खळबळजनक आरोप

राऊत कुटुंबातून मानसिक, शारीरिक छळासह जादूटोणा, अघोरी कृत्य करण्यात आल्याचा आरोपही सुनेने केला आहे. जबरदस्तीने डोक्यावरील केस कापले, बळजबरीने गोमुत्र प्यायला दिलं असे आरोप गिरीजा राऊतांनी केले. कणकेच्या काळ्या बाहुल्या, जिवंत कोंबडा अशी अंधश्रद्धा केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकारात राऊत कुटुंबातील ९ जणांसह राजापूर येथील काझी बाबा, सावंतवाडीतील फिरोज बाबा यांच्याकडे नेऊन ही कृत्य केली जात असल्याचे खळबळजवळ आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आले आहेत. याप्रकरणानंतर आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.