- Home
- Mumbai
- Maharashtra Govt Holiday : आज ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी, शाळांना सुटी आहे का? बॅंका बंद राहणार का? शेअर मार्केट सुरु राहणार का?
Maharashtra Govt Holiday : आज ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी, शाळांना सुटी आहे का? बॅंका बंद राहणार का? शेअर मार्केट सुरु राहणार का?
मुंबई : महाराष्ट्र सरकारने सोमवार, 8 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी अधिसूचना काढली. ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

विशेषतः सुफी आणि बरेलवी समाज हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करतो आणि मुस्लिम समाजासाठी याला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. त्यामुळे सरकारने मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. गणेशोत्सवामुळे ५ तारखेची सुटी रद्द करण्यात आली होती. त्याऐवजी ती ८ तारखेला जाहीर करण्यात आली आहे. तसा जीआर काढण्यात आला आहे.
4 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 5 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी रद्द केली होती. त्यामुळे आता 8 सप्टेंबर 2025 रोजी सरकारी सिक्युरिटीज, परकीय चलन (Forex) आणि मनी मार्केटमध्ये कोणतेही व्यवहार किंवा सेटलमेंट होणार नाही. म्हणजेच बॅंकांना सुटी राहील. सोमवारी बॅंका सुरु राहणार नाहीत.
या सुट्टीचा भारतीय शेअर बाजारावर (BSE आणि NSE) काहीही परिणाम होणार नाही. सोमवार, 8 सप्टेंबर रोजी व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील. गुंतवणूकदारांना सोयीसाठी बीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर (bseindia.com) ‘ट्रेडिंग हॉलिडेज’ या विभागात 2025 सालातील सर्व सुट्ट्यांची यादी उपलब्ध आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये शेअर बाजारासाठी कोणतीही नियोजित सुट्टी नाही.
2025 मधील उर्वरित शेअर बाजार सुट्ट्या
2 ऑक्टोबर (गुरुवार): गांधी जयंती / दसरा
21 ऑक्टोबर (मंगळवार): दिवाळी – लक्ष्मी पूजन
22 ऑक्टोबर (बुधवार): दिवाळी – बलिप्रतिपदा
5 नोव्हेंबर (बुधवार): प्रकाश गुरपुरब (श्री गुरु नानक देव जी)
25 डिसेंबर (गुरुवार): ख्रिसमस
केवळ मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील शाळांसाठी ही अधिसुचना काढण्यात आलेली आहे. मुस्लिम समाजाकडून काढल्या जाणाऱ्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. हा सण पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

