Parth Pawar - Kaynaat Dhar Engagement : अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा साखरपुडा कायनात धर यांच्याशी होणार आहे. २९ जुलै रोजी पुण्यात हा साखरपुडा होईल.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. २९ जुलै रोजी पार्थ पवार यांचा साखरपुडा होणार आहे. पार्थ पवार कायनात धर यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहेत. पुण्यात २९ जुलैला दोघांचा पुण्यात साखरपुडा होईल. अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झालं. प्लेन क्रॅश झाल्यानंतर बारामतीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या निधनानंतर अतिशय साध्या पद्धतीने पार्थ पवार आणि कायनात धर यांचा साखरपुडा पार पडणार असल्याची माहिती आहे.

कोण आहे अजितदादा आणि सुनेत्रा पवार यांची होणारी सून?
कायनात धर Design Box च्या टीममध्ये काम करतात अशी माहिती आहे. त्या मूळच्या काश्मीरमधील आहेत. त्या काश्मीरी पंडित आहेत. मात्र त्यांचं कुटुंब मागील अनेक काळापासून हरियाणात राहायला आहे. कायनात सध्या नोएडामध्ये राहतात. अजितदादा यांच्या निधनाआधी कायनात धरशी त्यांची भेटही झाली होती. अजितदादांकडून दोघांच्या नात्याला संमतीही होती. नुकतंच सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळेच्या लग्नात पार्थ पवारांसोबत कायनातदेखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी पहिल्यांदा त्या पवार कुटुंबातून पब्लिकली सर्वांसमोर आल्या होत्या.
कायनात धरचं कुटुंब आणि पवार कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. दोन्ही कुटुंब मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अजित पवार यांचं निधन झालेलं त्यावेळी कायनात बारामतीमध्ये पोहोचल्या होत्या. अजित पवारांच्या वरळी येथे झालेल्या शोकसभेतही कायनात होत्या. त्यानंतर पार्थ पवार आणि कायनात दोघे उज्जैन महाकाल मंदिरात देखील एकत्र पोहोचले होते.
दरम्यान, अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार २९ जुलै रोजी कायनात धरसोबत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. अजित पवार यांचा लहान मुलगा जय पवार यांचं आधीच लग्न झालं आहे. आता २९ जुलै रोजी पवारांच्या कुटुंबात आनंद येणार आहे. अजित पवारांच्या निधानानंतर आता अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा पार पडेल, अशी माहिती आहे.

