बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्याशिवाय त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीचा अर्ज केला आहे. त्यांनी जवळपास ४० हजार कोटींची मागणी केली आहे.
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्याशिवाय त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीचा अर्ज केला आहे. त्यांनी जवळपास ४० हजार कोटींची मागणी केली आहे. आतापर्यंत जवळपास ९७ टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
कोणते महत्वाचे घेतले निर्णय?
सरकारच्या वतीने महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये खासकरून शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे त्यांना सरसकट अग्रीम दिला जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी चांगली जाणार आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.


