तुम्हाला वैद्यकीय खर्चासाठी, शिक्षणासाठी किंवा कोणत्याही तातडीच्या वैयक्तिक गरजांसाठी निधीची आवश्यकता असली तरीही, गोल्ड लोन तुम्हाला तुमचे सोन्याचे दागिने तारण म्हणून देऊन जलद वित्तपुरवठा करण्याची परवानगी देते.
मुंबईतील भाऊचा धक्का परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांकडून स्थानिक मच्छीमार महिलांवर अरेरावी झाल्याच्या घटनांनंतर, मंत्री नितेश राणे यांनी कठोर इशारा दिला आहे. कोळी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा केली.
मुंबई महानगरपालिकेने बुधवारी होणारी १३ तासांची पाणीकपात रद्द केली आहे. हवामान खात्याच्या पावसाच्या इशाऱ्यामुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजा आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माधवबाग येथे झालेल्या कार्यक्रमात मोदी सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं. ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण देत ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा अभिमान आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे.
मुकेश अंबानी यांचे आलिशान घर 'एंटीलिया' एकेकाळी अनाथ मुलांसाठी असलेल्या जमिनीवर उभे आहे. या जमिनीचा इतिहास, करीम भाई इब्राहिम कोण होते आणि त्यांच्या दान केलेल्या जमिनीवर अंबानींचे 'एंटीलिया' कसे उभे राहिले याची संपूर्ण कहाणी जाणून घ्या.
मुंबईच्या 'अक्वा लाईन' मेट्रोमध्ये मोबाइल नेटवर्क नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॉल, इंटरनेट आणि यूपीआय सेवा ठप्प होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईत मे महिन्यात अचानक १०० वर्षांचा पाऊस विक्रम मोडला गेला. कोलाब्यात १ तासात १०४ मिमी पाऊस! शहर पाण्याखाली, रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत. हा फक्त मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस आहे की एखाद्या मोठ्या आपत्तीची पहिली सूचना? परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
मुंबईत मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, शहरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, मुंबई, ठाणे आणि रायगड धोक्याच्या झोनमध्ये आहेत. १९५० नंतर हा सर्वात लवकर आलेला मान्सून आहे.
Mumbai Rains Update : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. यामुळे लोकल सेवा देखील विस्कळीत झाली आहे.
mumbai