Ganpati Special Trains 2025: कोकण रेल्वेने गणेशोत्सव २०२५ साठी ११ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, भांडुप, पुणे येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी १२५ फेऱ्या उपलब्ध असतील. बुकिंग २५ जुलै २०२५ पासून सुरू होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत धर्मांतराच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. फसवणूक किंवा दबावाने होणारे धर्मांतर संविधान आणि कायद्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर टीका केली होती. यावरुनच दुबे यांनी राज ठाकरेंना ट्विट करत प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी दुबेंनी राज ठाकरेंना हिंदी शिकवल्याचे म्हटले आहे.
येत्या 20 जुलैला मुंबई लोकलच्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी एखाद्या ठिकाणी जायचा प्लॅन करत असाल तर आधीच वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. १९ जुलै २०२५ रोजी हवामान खात्याने ढगाळ वातावरण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा रोड येथील सभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. मराठी कानावरती समजणार नाही तर कानाखाली बसणारच, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात राहताय तर मराठी शिका, असं आवाहनही त्यांनी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपचीच राहणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे कौतुक केले आणि मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या बदलांवर प्रकाश टाकला.
“आमदारांचे आचरण आदर्शवत असावे आणि लोकशाहीच्या मंदिरात योग्य वागणूक अपेक्षित आहे. यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून आम्ही सर्व पावले उचलणार आहोत,” असे नार्वेकर यांनी ठामपणे स्पष्ट केले.
सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे केवळ प्रवाशांचा जीव वाचणार नाही, तर मुंबईसारख्या गतिशील शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवा श्वास मिळू शकतो.
या हाणामारीचा केंद्रबिंदू असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी आपली बाजू नम्रपणे मांडली असली, तरी यामागे विरोधकांनी भाजपवर ‘हनीट्रॅप प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव’ असल्याचा आरोप केला आहे.
mumbai