- Home
- Mumbai
- Mumbai Metro 3 Timing : मुंबई मॅरेथॉनसाठी मेट्रो ३ सज्ज! १८ जानेवारीला धावणार 'स्पेशल मेट्रो'; पहा पहाटेचे नवीन वेळापत्रक
Mumbai Metro 3 Timing : मुंबई मॅरेथॉनसाठी मेट्रो ३ सज्ज! १८ जानेवारीला धावणार 'स्पेशल मेट्रो'; पहा पहाटेचे नवीन वेळापत्रक
Mumbai Metro 3 Timing : टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी मुंबई मेट्रो ३ ने विशेष सोय केली आहे. १८ जानेवारी रोजी, अॅक्वा लाईनवर पहाटे ३:३० वाजल्यापासून अतिरिक्त मेट्रो सेवा चालवल्या जाणार आहेत.

मुंबई मॅरेथॉनसाठी मेट्रो ३ सज्ज! १८ जानेवारीला धावणार 'स्पेशल मेट्रो'
मुंबई : उद्या रविवार, १८ जानेवारी रोजी होणाऱ्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६' साठी मुंबई मेट्रो ३ प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या हजारो धावपटूंना वेळेत पोहोचता यावे, यासाठी अॅक्वा लाईन (मेट्रो ३) वर पहाटेपासूनच अतिरिक्त सेवा चालवल्या जाणार आहेत.
पहाटे ३:३० वाजल्यापासून पहिली फेरी!
साधारणपणे सकाळी उशिरा सुरू होणारी मेट्रो उद्या मॅरेथॉननिमित्त पहाटेच रुळावर धावणार आहे. नवीन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.
पहिली मेट्रो: पहाटे ३:३० वाजता (आरे JVLR आणि कफ परेड या दोन्ही टोकांवरून एकाच वेळी सुटेल).
दुसरी मेट्रो (आरे कडून): पहाटे ४:३० वाजता.
दुसरी मेट्रो (कफ परेड कडून): पहाटे ४:५० वाजता.
मॅरेथॉन आणि मेट्रोचे कनेक्शन
टाटा मुंबई मॅरेथॉनची सुरुवात पहाटे ५:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून होणार आहे. दक्षिण मुंबईत जाण्यासाठी धावपटूंना 'अॅक्वा लाईन' अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.
मेट्रो प्रशासनाचा संदेश: “मॅरेथॉनसाठी लवकर प्रवास करणाऱ्या धावपटूंनी जलद, सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी मेट्रो ३ चा लाभ घ्यावा. तुमच्या सुविधेसाठी आम्ही १८ जानेवारीला अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले आहे.”
प्रवाशांसाठी महत्त्वाची टीप
जर तुम्ही उद्या विकेंडसाठी बाहेर पडणार असाल किंवा कामावर जाणार असाल, तर सकाळी धावणाऱ्या या जास्तीच्या फेऱ्यांमुळे तुमचा प्रवास अधिक सोपा होईल. मेट्रोच्या अधिकृत 'X' (ट्विटर) हँडलवरून या बदलांची पुष्टी करण्यात आली आहे.

