विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये एका प्रवाशाने चक्क दारू प्यायल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दारू पिऊन त्याने रिकामी बाटली थेट रुळांवर फेकली. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षेवर आणि नियमांच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मुंबई : विरारवरून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशाने चक्क बाटलीतून दारू प्यायल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका जागरूक प्रवाशाने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि तो मीडियाला दिला. ही घटना विरार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वरून सकाळी ११:५० वाजता सुटलेल्या चर्चगेट लोकलमध्ये घडली आहे.
या व्हिडिओमध्ये तो माणूस ट्रेनमध्ये बसून काचेच्या बाटलीतून दारू पिताना स्पष्ट दिसतोय. एवढंच नाही, तर दारू संपल्यावर त्याने ती रिकामी बाटली थेट चालत्या ट्रेनमधून रुळांवर भिरकावून दिल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळतंय.
इथे पाहा व्हायरल व्हिडिओ
Scroll to load tweet…
या धक्कादायक प्रकारामुळे लोकल ट्रेन आणि रेल्वे स्टेशन परिसरात दारू पिणाऱ्या प्रवाशांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वेच्या सुरक्षेबाबतही लोक आता चिंता व्यक्त करत आहेत.

