सोशल मीडियावर या विभागाकडून प्रचार प्रसार करणे, त्याच्याशी संबंधित व्हीडिओ लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. तक्रारीचा ईमेल बाऊन्स होणार नाही, सर्व तक्रारी राज्यातून एकाच ठिकाणी येतील, त्या टाळल्या जाणार नाहीत, किंवा त्याची माहिती लीक होणार नाही, असा विश्वास देखील प्रचार-प्रसारातून देणे आवश्यक आहे.

मुंबई : राज्यात सर्वत्र भेसळखोरांवर कारवाई होत आहे. खाण्याचे पदार्थ, औषधं, फळे या सर्वच गोष्टींमध्ये केमिकल्सचा वापर करुन जनतेच्या जीवाशी खेळले जात आहे, मात्र या भेसळखोरांची तक्रार नेमकी कुठे आणि कशी करायची हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. संबंधित विभाग हा सोशल मीडियावर तरी अजून पाहिजे तेवढा अॅक्टीव्ह झालेला दिसत नाही. स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी याकडे डोळेझाक करत असल्याच्याही तक्रारी आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आम्ही तक्रारीसाठी काही माहिती या बातमीत देत आहोत. पण संबंधित अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अशावेळी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे, जे कुठेच दिसून येत नाही, फेसबूक किंवा इतर पेजही तेवढे प्रभावशाली बनवलेले नाहीत, आपले सरकार पोर्टलवर मात्र एक पर्याय दिला आहे.

खाली काही पर्याय दिले आहेत

महाराष्ट्र सरकारकडे भेसळीची तक्रार करण्यासाठी तुम्ही थेट महाराष्ट्र FDA (Food and Drug Administration) किंवा राज्याच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार दाखल करू शकता.

पर्याय 1: महाराष्ट्र FDA

तक्रार नोंदवा: Maharashtra FDA Grievance Redressal

https://fda.maharashtra.gov.in/grievance-redressal/

भेसळयुक्त अन्न, निकृष्ट दर्जाचे पदार्थ, बनावट दूध, पनीर, तेल, मसाले इत्यादींबाबत तक्रार करू शकता.

पर्याय 2: महाराष्ट्र शासन तक्रार निवारण पोर्टल (Aaple Sarkar Grievance)

https://grievances.maharashtra.gov.in/mr

Maharashtra Grievance Portal

jc-foodhq@gov.in

संबंधित विभाग म्हणून अन्न व औषध प्रशासन (FDA) निवडून तक्रार नोंदवता येते.

तक्रार करताना खालील माहिती द्या, संशय असेल तर तसं वर्णन करा

दुकान/व्यवसायाचे नाव व पत्ता

बिल (असेल तर)

उत्पादनाचा फोटो

भेसळीचा संशय का आहे याचे वर्णन

व्हिडिओ किंवा इतर पुरावा

भेसळयुक्त मालाची विल्हेवाट लावण्याचं काम भेसळखोरांकडून सुरु आहे. यात अनेक ठिकाणी केमिकल्स फेकल्याचंही निदर्शनास येत आहे. दूध, साजूक तुप, मिठाई, फळे, खाद्यतेल यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स आणि भेसळ असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. केमिकल्सच्या भेसळीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना दुर्धर आजार लागतात, असं संशोधकांचं मत आहे.

तुकाराम मुंडे हे बेधडक, नीडर आएएएस ऑफिसर आहेत, ते रुजू झाल्यापासून भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. तर आता मोठ्या प्रमाणात भेसळखोर पकडले जातील अशी आशा देखील लोकांची पल्लवीत झाली आहे. 

फक्त खटकणारी बाब एकच आहे, सोशल मीडियावर तक्रार कुठे करायची, कशी करायची ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, यातून मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येतील आणि अॅक्शनमोडवर असलेल्या तुकाराम मुंढे यांना कारवाईसाठी आणखी बळ मिळेल.