मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिकेच्या घटलेल्या महसुलामुळे विकासकामे थांबल्याचा आरोप केला आहे, तसेच त्यांनी एका परिचारिकेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई: मुंबईमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडताना दिसून येत आहे. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे या एकमेकांवर टीका करत आहेत. महानगरपालिकेच्या महसुलात घट झाली असून त्याचा परिणाम विकासकामांवर होत असल्याचा दावा पेडणेकर यांनी केला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आर्थिक परिस्थितीवर केलं भाष्य 

पेडणेकर यांनी यावेळी बोलताना महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं आहे. बेस्टच्या आर्थिक अडचणींचा यावेळी त्यांनी खासकरून उल्लेख केला. मुंबईतील काही भागातील पाणी तुंबण्याची समस्या थांबल्याचं यावेळी पेडणेकर यांनी मान्य केलं आहे. एका परिचारिकेवर झालेल्या हल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

डॉक्टर आणि परिचारिका जीव वाचवण्याचं करतात काम 

डॉक्टर आणि परिचारिका हे रुग्णाचं जीव वाचवण्याचं काम करत असतात. त्यांच्यावर झालेला हल्ला हा चुकीचं असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे. रुग्णालयातील डॉक्टर किंवा परिचारिका यांच्यावर हात उचलणं योग्य ठरत नाही. या गुन्ह्यातील दोषींवर कडक कारवाई व्हायला हवी असं यावेळी बोलताना पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

मेट्रो प्रकल्पांसाठी शुल्क भरले का?

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मेट्रो प्रकल्पांबाबत भाष्य केलं. त्यांनी बोलताना म्हटलं की, सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाजवळ चार पोल हटवले होते. त्यावेळी १९ ते २० लाख रुपये शुल्क भरले होते. अशा प्रकारे आचार्य अत्रे चौक, नेहरू विज्ञान केंद्र परळी आणि इतर मेट्रो स्थानकांबाबत त्यांनी जाब विचारला. अशा प्रकारचे शुल्क या मेट्रो स्थानकांबाबत भरले होते का असं त्यांनी म्हटलं आहे.

आर्थिक महसुलात झाली घट 

महानगरपालिकेच्या आर्थिक महसुलात घट झाल्याचा उलेल्ख यावेळी पेडणेकर यांनी केला. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने महसूल वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. वसई-विरार, नालासोपारा, अंधेरी सबवे आणि इतर भागांमध्ये अजूनही पाणी साचत असल्यामुळं महानगरपालिकेच्या नियोजनावर पेडणेकर यांनी टीका केली आहे.