घाटकोपर दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार, पोलिसांकडून शोध सुरू

| Published : May 15 2024, 01:29 PM IST

bhavesh bhinde

सार

घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी भावेश भिंडे याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे.

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी भावेश भिंडे याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॅावरमध्ये रहायला होता.

आरोपी भावेश भिंडे फरार

मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील पंतनगर येथे असलेल्या पेट्रोल पंपावर 13 मे ला वादळी वाऱ्यामुळे मोठा जाहिरातीचा फलक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या प्रकरणात भावेश भिंडे आरोपी असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेल्या 88 जण जखमी झाले आहेत. 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

घाटकोपरमधील पंतनगर येथील पेट्रोल पंपावर 120 बाय 120 आकाराचा मोठा होर्डिंग कोसळला. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 14 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. या प्रकरणात आरोपी भावेश भिंडेसह इतर काही जणांवर 304, 338, 337, 34 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलिसांकडून भावेश भिंडेचा शोध सुरु असून तो सध्या फरार असल्याचं समोर आलं आहे. भावेश भिंडे कुटुंबासह गायब झाला आहे.