क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, हे फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत.

क्रिकेटचा देव म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला सानिया चांडोकसोबत साखरपुडा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा कार्यक्रम कुटुंब आणि जवळच्या लोकांचा उपस्थितीसोबत पार पडला. सानिया ही मुंबईतील पेट न्यूट्रिशन आणि वेलफेअर फर्म ‘मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपी’मध्ये पार्टनर आणि डायरेक्टर आहे. ती मुंबईतील मोठे उद्योगपती रवी घई यांची नात आहे.

फोटो व्हायरल झाले 

सोशल मीडियावर अर्जुन आणि सानिया या दोघांचा साखरपुडा झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोमध्ये दोघे एकमेकांना अंगठी घालताना दिसून आले. अर्जुनने काळ्या रंगाचा सूट घातला आहे तर सानियाने लालसर रंगाचा वन पिस घातला आहे. दुसऱ्या एका फोटोत अर्जुनने गदर निळ्या रंगाची प्लेन शेरवानी घातली आहे तर सानियाने फिकट गुलाबी रंगाचा घागरा घातल्याचे दिसत आहे. दोघेही अतिशय क्यूट दिसत आहेत.

एआयच्या मदतीने बनवले फोटो 

सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने तयार केले आहेत. आजकाल सोशल मीडियावर एआयच्या मदतीने फोटो बनवून व्हायरल केले होते. असेच काही वापरकर्त्यांनी अर्जुन आणि सानियाचे फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. पण प्रत्यक्षात हे फोटो पूर्णपणे फेक आहेत.

मोठ्या कुटुंबाशी संबंध रवी घई हे ग्राव्हिस ग्रुपचे चेअरमन आहेत. ग्राव्हिस ग्रुप हॉस्पिटॅलिटी आणि फूड-अँड-बेव्हरेज उद्योगात एक मोठे नाव आहे. अर्जुन आणि सानिया दोघांचे शिक्षण मुंबईत झालं आहे. सानिया आणि सारा या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. सारा तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचे काही फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सारा आणि सानिया जयपूरमध्ये एकत्र फिरताना आणि आयपीएल सामना पाहताना दिसत आहेत.