विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून १७ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटल्याची चर्चा आहे. महायुतीच्या या विजयानंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं वर्चस्व दिसतं आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. विधान परिषद निवडणुकीत १७ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. महायुतीच्या या दमदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं वर्चस्व दिसून येत आहे. १७ पैकी १६ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. नाशिकमध्ये एका जागेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा विजय झाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे.नरेंद्र दराडे यांना २४८, तर गोकुळ गिते यांना ३५७ मतं मिळाली आहे. नरेंद्र दराडे यांचा अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी पराभव केला आहे. त्यामुळे नाशिकमधील हा निकाल धक्कादायक मानला जात आहे.

नाशिकमध्ये निवडून आलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गिते हे गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जातात. त्यांना भाजपच्या मतदारांकडून मोठा पाठिंबा असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही त्यांना मतं मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नाशिकच्या निकालाने महायुतीला कोणताही राजकीय फटका बसला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या १७ पैकी १७ जागांवर महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची मतं फुटल्याचं चित्र असून याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना मिळाल्याची चर्चा आहे.