Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या निलेश चव्हाणची पोलखोल झाली आहे. खरंतर, निलेश चव्हाणही त्याच्या पत्नीचा छळ करायचा हे आता उघड झाले आहे.

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना 23 मे रोजी पहाटे 4.30 वाजता अटक करण्यात आली. हे दोघंही गेल्या सात दिवसांपासून फरार होते.तर वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबीयांनी पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात तक्रार दाखल केली आहे. 20 मे रोजी, वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी तिचे नातेवाईक निलेश चव्हाणच्या कर्वेनगरमधील घरी गेले असता, निलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावले आणि बाळ देण्यास नकार दिला.निलेश हा वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणेचा (नणंद) मित्र आहे. तो हगवणे कुटुंबीयांच्या कौटुंबिक वादात सतत सहभागी राहिलेला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पत्नीवर स्पाय कॅमेऱ्याद्वारे नजर 
निलेश चव्हाणने स्वतःच्या पत्नीचा 2019 साली स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामुळे त्याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

स्पाय कॅम प्रकरणाचे तपशील: 

  • लग्न – 3 जून 2018
  • जानेवारी 2019 – पत्नीला सिलिंग फॅनवर संशयास्पद वस्तू आढळली
  • फेब्रुवारी 2019 – एसीमध्ये लपवलेला कॅमेरा आढळला
  • ल्यापटॉपमध्ये पत्नीचे आणि इतर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ
  • जबरदस्तीने शारीरिक संबंध, चाकूचा धाक, गळा दाबणे
  • सासरकडूनही छळ, अखेर पत्नीने घर सोडले
  • 14 जून 2022 रोजी गुन्हा दाखल
  • सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, पण मुंबई उच्च न्यायालयाने दिला जामीन

बांधकाम व्यावसायिक निलेश चव्हाणची पार्श्वभूमी

  •  पोकलेन मशीन व बांधकाम व्यवसाय
  • औदुंबर पार्क, कर्वेनगर येथे वडिलांच्या नावे तीन फ्लॅट
  • कौटुंबिक वादात सहभाग असणारा, कायद्याचे उल्लंघन करणारा व्यक्ती म्हणून ओळख