तुकाराम मुंढे यांना पदभार स्वीकारायला अवघे 4 ते 5 दिवस झाले, पण भेसळखोरांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे, सळो की पळो अशी अवस्था असताना भेसळखोर आता अन्नात मिसळले जाणारे केमिकल्स फेकायला लागले आहेत, अनेक ठिकाणी केमिकल्सचे ड्रम्स अज्ञात लोकांनी फेकून दिले आहेत. एफडीएचे सुस्त अधिकारी कसे कामाला लागले आहेत.

मुंबई : आयएएस ऑफिसर तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी बदली केली असली, तरी त्यांच्यातली काम करण्याची धडाडी आणि कर्तव्यदक्षता कुणाला बदलता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता तर मुंढे यांचा तर महाराष्ट्रातील भेसळखोरांनी धसका घेतला आहे. अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध, खवा आणि केमिकल्स नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यात दूध, तुप आणि खवा यांच्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं उघड झालं आहे. यात एफडीएचे अधिकारी स्वत:हून कामाला लागले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी आल्यानंतर भेसळखोरांनी आपोआप मैदान सोडायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी भेसळीत वापरले जाणारे केमिकल्स फेकून दिल्याचे समोर आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात खदाणीत ब्युटरीक अॅसिडचे 250 लीटरचे 35 ड्रम एका खदानीत फेकल्याचे समोर आले आहे. भेसळीत हे अॅसिड वापरले जात असल्याचा संशय आहे.

तुकाराम मुंढे आले आणखी कोणत्या क्षेत्रात भेसळखोर सापडणार

तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा बडगा आपल्यावर नको म्हणून एफडीएचे अधिकारी झाडून कामाला लागले आहेत. साजूक तुपात सनफ्लॉवर ऑईल, पाम तेल मिसळण्याचे प्रकार महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यात काही नामांकीत ब्रॅण्डची नावे देखील येऊ शकतात.

तुकाराम मुंढे यांची 21-22 वर्ष सेवेतली ही 25 वी बदली आहे. तुकाराम मुंढे यांचं कर्तव्यदक्ष वागणं अनेकांच्या पचनी पडत नसल्याने, त्यांची सतत बदली केली जात असते, पण तुकाराम मुंढे हे बदलीची कधीच पर्वा करताना दिसत नाहीत.

तुकाराम मुंढे यांना मोठ्या प्रमाणात विरोध देखील झाला आहे, पण जेव्हा काही महिन्यातच तुकाराम मुंढे यांची बदली होते, तेव्हा रस्त्यावर त्यांच्या समर्थनार्थ सामान्य जनता येते हे देखील लपून राहिलेलं नाही.

तुकाराम मुंढे यांची बदली कोणत्या सरकारच्या काळात कमी वेळेस झाली, कोणत्या सरकारच्या काळात जास्त वेळा, याचा विचार करण्यापेक्षा कोणत्याही सरकारने तुकाराम मुंढे यांना संपूर्ण काळ, निदान 3 वर्ष कुठेही कोणत्याही सरकारने कायम ठेवलेलं नाही.

सर्वसामान्य सरकारी कर्मचारी जेव्हा बदलीच्या नावाने थरथरतात, मानसिक ताण तणावात त्यांच्या वाढ होते. तेव्हा तुकाराम मुंढे यांनी जेवढे वर्ष सेवा केली, त्यापेक्षा जास्त वेळा त्यांची बदली झाली आहे. पण तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्षमतेत कधीही कमीपणा आला नाही, आत्मविश्वास ढासळला नाही.

मुंढे यांनी जेथे जेथे बदली झाली, जो काही पदभार सांभाळला तेथे काही ना काही त्यांनी नवीन करुन दाखवलं सर्वसामान्य जनतेशी नाड जोडली. पण ज्यांना तुकाराम मुंढे यांचं काम अडचणीत आणत होतं, त्यांनी राजकारण्यांचा वापर करुन त्यांची सतत बदली करण्याचा प्रयत्न केला. तुकाराम मुंडे यांची राजकारणी बदली करु शकतात. त्यांची समाजासाठी काम करण्याची नैतिकता कधी कमी करु शकत नाहीत, बदलू शकत नाहीत.