Sachin Ahir Join Shivsena Shinde Group : एकनाथ शिंदे यांनी पुन्हा धक्कातंत्राचा वापर करत उबाठाला मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटातील सचिन अहिर यांनी त्यांची साथ सोडली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले गेले आहे. यावर आता राजकीय नेतेमंडळींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

Sachin Ahir Join Shivsena Shinde Group : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सचिन अहिर यांनी आता शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर आता राजकीय नेतेमंडळींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

निलम गोऱ्हे यांचा विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा कार्यकाळ संपला होता. यानंतर शिवसेनेकडून पुन्हा निलम गोऱ्हे यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगली होती. पण शिंदे गटातून सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावर निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.

निलम गोऱ्हे यांनी म्हटले की, मी नाराज नाही आहे. सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज भरला आहे. याव्यतिरिक्त काहीही विधान निलम गोऱ्हे यांनी करणे टाळले.

संजय शिरसाट काय म्हणाले?

संजय शिरसाट म्हणाले की, "आज विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचे नाव पुढे करण्यात आले. सचिन अहिर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात सामील झाले आहेत."

Scroll to load tweet…

नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या मोठ्या बातमीवर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणेंनी म्हटले की, महाराष्ट्रातही एक अभिषेक बॅनर्जी आहे, जो उबाठाला खाली करणार आहे. त्यांच टीएमसीसारखं होणार आहे." याशिवाय उद्धव ठाकरेंना आता वरळीमध्येही सभा घ्यावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर वर्ष 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी माती खाल्ली. पण आता फडणवीसांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देतायत. यासह 2019 मध्ये असं केलं नसतं तर आजच्यासारखे हे दिवस त्यांना बघावे लागले नसते." याव्यतिरिक्त त्यांनी ठाकरे परिवारावरही निशाणा साधला.

सचिन अहिरांचा शिंदे सेनेत प्रवेश

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सचिन अहिरांना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली. अहिरांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थितीत होत्या. त्यामुळे या पक्षांतराला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.