ही पुण्यातील धक्कादायक घटना आहे, बिल्डरने 24 वर्षाच्या मुलाच्या लग्नासाठी जयपूरमध्ये 17 कोटीचा पॅलेस बूक केला, 2 विशेष विमाने येण्या-जाण्यासाठी ठेवले, पण तो नवरदेव होवूच शकला नाही, कारण त्याला तिनेच संपवलं
पुणे : पुण्यातील 2 बड्या उद्योगपतींच्या मुलांचं लग्न नोव्हेंबर महिन्यात पार पडणार होतं. सिया गोयल या मुलीचे वडील मोठे मसाला व्यापारी आहेत. तर केतन अगरवाल याचे वडील हे देखील मोठे बिल्डर आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात या दोघांचं लग्न होणार होतं. लग्नासाठी जयपूरला 17 कोटी रुपयांना पॅलेस बूक करण्यात आला होता. पाहुणे मंडळींसाठी 2 विमानं बूक करण्यात आली होती. कोट्यवधी रुपये या लग्न सोहळ्यासाठी खर्च केले जाणार होते.

सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत
पण सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचला. केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून दिलं, त्याचा या घटनेत मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात वाटला, पोलीस तपासातनंतर लक्षात आलं हा अपघात नव्हता, तर कट करुन केतन अगरवालचं आयुष्य संपवलं होतं. पोलिसांनी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांना अटक केली आहे.
सिया अग्रवाल हिची इन्स्टाग्रामवर पोस्ट
मात्र सिया हिने केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर पोस्ट केली आहे, ती पोस्ट अशी आहे, जणू त्याचा मृत्यू अपघातीच झाला. सिया इन्स्टावर लिहिते, माझ्या वाढदिवशीच तू मला सोडून गेला, लग्न काही महिन्यांवर असताना तू सोडून गेला. हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. मी सुद्धा काही स्वप्न पाहिली होती, आता काही प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळणार नाहीत. तू मला सोडून गेलास, मी तुझ्यावर कितीतरी प्रेम करत होते, तुझ्या आत्म्यास शांती मिळो.
सिया गोयल हिने ही पोस्ट का केली असावी
सिया गोयल हीला आता केतन अगरवालच्या मृत्यु प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तरी देखील मृत्यूनंतर केतनशी आपण खूप प्रेम करत होतो, अशी पोस्ट टाकल्याने सियाला नेमकं काय संदेश द्यायचा आहे, हे पोलीस तपासातच समोर येणार आहे.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी
या प्रकरणात प्राथमिक तपासात सध्या तरी पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरीला अटक केली आहे. तपासात आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती या प्रकरणी आणखी काही पुरावे लागत आहेत, घटनेचा एक एक धागा उघडला जात आहे. हे प्रकरण अतिशय दुर्देवी असलं तरी यातील घटनाक्रम जे समोर येत आहेत ते अंगावर का
केतन अगरवाल हा 24 वर्षाचा युवक होता, सियाच्या प्रेम प्रकरणात त्याचा नाहक बळी गेल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा होत आहे.


