MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Pune Water Cut News: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरावर १५% पाणीकपातीचे संकट; जलसंपदा विभागाचे महापालिकेला कडक आदेश

Pune Water Cut News: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरावर १५% पाणीकपातीचे संकट; जलसंपदा विभागाचे महापालिकेला कडक आदेश

Pune Water Cut News: संभाव्य पाणीटंचाईमुळे जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला पाण्यात १५% कपात करण्याचे आदेश दिले आहेत. 'अल-निनो'च्या शक्यतेमुळे आणि मान्सून लांबल्यास पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 09 2026, 07:09 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरावर १५% पाणीकपातीचे संकट
Image Credit : Getty

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! शहरावर १५% पाणीकपातीचे संकट

पुणे: कडक उन्हाळ्याच्या झळा बसत असतानाच आता पुणेकरांच्या चिंतेत भर पडणारी एक बातमी समोर आली आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला दरमहा उचलल्या जाणाऱ्या पाण्यात १५ टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्यात पुणेकरांना पाण्यासाठी काटकसर करावी लागणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पाणीकपातीचा निर्णय का घेण्यात आला?
Image Credit : Getty

पाणीकपातीचा निर्णय का घेण्यात आला?

यंदा 'अल-निनो'च्या प्रभावामुळे मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट आहे. पाऊस लांबणीवर पडण्याची किंवा कमी होण्याची शक्यता असल्याने, खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. जलसंपदा विभागाने पालिकेला स्पष्ट बजावले आहे की, “जर आतापासूनच पाणी नियोजन केले नाही आणि भविष्यात टंचाई निर्माण झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची असेल.” 

Related Articles

Related image1
Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट! ५३ पैकी ६ उमेदवार माघारी; आता ४७ जण मैदानात
Related image2
Maharashtra Monsoon Update: यंदा पावसाचे दोन चेहरे! कधी बरसणार दमदार अन् कुठे ओसरणार जोर? वाचा सविस्तर
35
पुणे शहरावर काय परिणाम होणार?
Image Credit : Getty

पुणे शहरावर काय परिणाम होणार?

पाणी कपातीचे गणित: पुणे शहर सध्या दररोज १७५० दशलक्ष लिटर पाणी उचलते. नव्या आदेशानुसार, पालिकेला दरमहा ०.२७५ टीएमसी पाण्याची कपात करावी लागेल.

पुरवठ्यावर परिणाम: या कपातीमुळे शहरातील अनेक भागांत दिवसातून एकदाच पाणी येण्याची किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता आहे. 

45
धरणसाठ्याची सद्यस्थिती काय?
Image Credit : Getty

धरणसाठ्याची सद्यस्थिती काय?

खडकवासला साखळीतील चारही धरणांमध्ये सध्या १३.२० टीएमसी (४५.२९%) साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (१२.०४ टीएमसी) हा साठा थोडा जास्त असला, तरी पावसाच्या लहरीपणामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे. 

55
प्रशासनाचे आवाहन
Image Credit : Getty

प्रशासनाचे आवाहन

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याचा अपव्यय टाळा. गाडी धुणे, अंगणात पाणी मारणे यांसारख्या गोष्टी टाळून पुणेकरांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट! ५३ पैकी ६ उमेदवार माघारी; आता ४७ जण मैदानात
Recommended image2
Maharashtra Monsoon Update: यंदा पावसाचे दोन चेहरे! कधी बरसणार दमदार अन् कुठे ओसरणार जोर? वाचा सविस्तर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved