- Home
- Maharashtra
- रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुणे-दौंड मार्गावर 'मेगाब्लॉक'; हुतात्मासह ३८ गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुणे-दौंड मार्गावर 'मेगाब्लॉक'; हुतात्मासह ३८ गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Pune Daund Railway Megablock : पुणे रेल्वे विभागात दौंड-काष्टी दरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे २४, २५ जानेवारीला मेगाब्लॉक जाहीर केला. या निर्णयामुळे पुणे-सोलापूर, पुणे-भुसावळ मार्गावरील २६ एक्स्प्रेस, १२ डेमू गाड्यांसह एकूण ३८ गाड्या रद्द झाल्यात.

रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! पुणे-दौंड मार्गावर 'मेगाब्लॉक'
पुणे : जर तुम्ही येत्या २४ किंवा २५ जानेवारीला रेल्वेने प्रवासाचा बेत आखला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुणे रेल्वे विभागातील दौंड-काष्टी स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि 'नॉन-इंटरलोकिंग'चे तातडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांचा मोठा 'मेगाब्लॉक' जाहीर केला असून, यामुळे पुणे-सोलापूर आणि पुणे-भुसावळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडणार आहे.
३८ गाड्यांना 'ब्रेक', या गाड्या झाल्या रद्द
दोन दिवसांच्या या ब्लॉकमुळे एकूण २६ एक्स्प्रेस आणि १२ डेमू गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने खालील गाड्यांचा समावेश आहे.
पुणे-सोलापूर: हुतात्मा एक्स्प्रेस आणि इंटरसिटी एक्स्प्रेस.
पुणे-विदर्भ: नागपूर (गरीबरथसह), अमरावती आणि अजनी एक्स्प्रेस.
मराठवाडा: पुणे-नांदेड आणि पनवेल-नांदेड एक्स्प्रेस.
इतर: पुणे-हरंगुळ, दौंड-निजामुद्दीन आणि हडपसर-सोलापूर डेमू.
प्रवासाचा मार्ग बदलला!
काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द न करता त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना आता फिरून प्रवास करावा लागणार आहे.
यशवंतपूर-चंदीगड, तिरुअनंतपुरम-मुंबई आणि हुबळी-निजामुद्दीन: या गाड्या आता लोणावळा-कल्याण-मनमाड मार्गे धावतील.
सातारा-दादर एक्स्प्रेस: ही गाडी सातारा-जेजुरी-पुणे मार्गे चालवली जाईल.
'या' गाड्यांच्या वेळेत बदल (Re-scheduled)
काही गाड्या रद्द न होता उशिराने धावतील, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
पुणे-हावडा एक्स्प्रेस: ४ तास उशिराने.
पुणे-जम्मूतवी: २ तास उशिराने.
कुर्ला-विशाखापट्टणम: २ तास उशिराने.
पुणे-राणी कमलापती: १ तास उशिराने.
प्रवाशांना सूचना
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी खिडकीवर आपल्या गाडीचे स्टेटस तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.

