Lok Sabha Election Result 2024: श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेनेच्या सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंना विनंती

| Published : Jun 08 2024, 01:10 PM IST

MP Shrikant Shinde

सार

Lok Sabha Election Result 2024: श्रीकांत शिंदे यांची नुकतीच शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. आता या तरुण खासदाराला मंत्रिपद द्यावे अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालानंतर आता केंद्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी 9 जूनला संध्याकाळी 7 वाजता दिल्लीत हा शपथविधी होणार आहे. यानंतर आता मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणकोण असणार याची चर्चा आहे. एनडीएतील घटकपक्षांना 4 खासदारांमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद असं सूत्र ठरल्याची चर्चा आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. आता शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदामध्ये श्रीकांत शिंदे यांचा समावेश करावा अशी मागणी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही वाद नको म्हणून काही खासदारांनी ही भूमिका घेतली. शिवसेनेच्या विजयी खासदारांमध्ये बुलढाण्याचे प्रतापराव जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, हातकणंगलेचे धैर्यशील माने, छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे, मुंबई उत्तर पश्चिमचे रविंद्र वायकर असे सर्व वरिष्ठ नेते आहेत.