Satbara Marks Meaning : सातबारा उतारा हे जमिनीचे ओळखपत्र असून त्यावरील H, NH, P, PR यांसारख्या खुणा मालकी, वारसाहक्क, कायदेशीर स्थिती दर्शवतात. या खुणांचे अर्थ समजून घेतल्यास जमिनीचे व्यवहार पारदर्शक होतात आणि भविष्यातील कायदेशीर समस्या टाळता येतात.
MSEDCL Solar Power For Farmers : महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित भव्य प्रकल्प सुरू केला. राज्यभरात ५१२ सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने पारंपरिक वीज जाळ्यावरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांना स्थिर वीजपुरवठा मिळतोय.
Maharashtra : आज, १ डिसेंबरपासून एअर इंडिया एक्सप्रेसने नागपूर–बेंगळुरू दरम्यान दररोज दोन उड्डाणे सुरू केली आहेत. वेळापत्रक जाहीर झाले असून तीन दिवसांतच ६०% सीट्स बुक झाल्या आहेत.
Solapur IT Park Project : बेंगळुरू आणि पुण्यानंतर आता सोलापुरात देशातील तिसरे सर्वात मोठे आयटी पार्क उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागा निश्चित झाली असून, यामुळे 45 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
Mahaparinirvan Special Trains : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 4 ते 8 डिसेंबर 2025 दरम्यान नागपूर, अमरावती, कलबुर्गी, कोल्हापूर येथून मुंबईसाठी एकूण 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
Kul Kayda New Rules For Land Sale : राज्य शासनाने कूळ कायद्यात सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे जमीन व्यवहाराची प्रक्रिया सुलभ झाली आहे. यानुसार, कूळ मालकी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर १० वर्षे पूर्ण झाल्यावर जमीन विक्रीसाठी सरकारी परवानगीची गरज नाही.
MahaDBT PoCRA Uniform Subsidy : राज्य सरकारने महाडीबीटी, पोकरा पोर्टलवरील सर्व कृषी योजनांना समान ५० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या बदलामुळे दोन्ही योजनांत अनुदानातील तफावत संपुष्टात येईल.
NA Land Online : नाशिक जिल्ह्यात १ डिसेंबरपासून नॉन-अॅग्रिकल्चर (NA) परवानगी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होणार. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे अर्जदारांना होणारा विलंब, गैरव्यवहार आणि त्रास टाळण्यास मदत होईल.
राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतींच्या 2 डिसेंबरला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक क्षेत्रातील सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा हा या सुट्टीचा उद्देश आहे
ED च्या SBI कार लोन घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा—पुण्यात 12 ठिकाणी टाकलेल्या धाडीत BMW, मर्सिडीज आणि लँड रोव्हर जप्त. बनावट कागदपत्रांवर कोट्यवधी रुपयांची महागडी कार कर्ज मंजूर करून बँकेचे मोठे नुकसान केल्याचा आरोप आहे.
Maharashtra