पीएम मोदी यांनी मुंबईत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर ही तीन नौदलाची लढाऊ जहाज राष्ट्राला समर्पित केली. या जहाजांच्या निर्मितीत ७५% स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. मोदी नवी मुंबईतील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात तीन युद्धनौकांचे लोकार्पण, इस्कॉन मंदिराचे उद्घाटन आणि महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात नौदलाच्या ताकदीत भर पडणार असून, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत.
वाल्मिक कराड यांना मकोका अंतर्गत अटक करण्यात आल्याने राज्याच्या राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय असून, त्यांच्या समर्थकांनी परळीत बंद पुकारला आहे.
बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. जुन्या एसआयटीतील काही अधिकाऱ्यांचे फोटो खंडणी प्रकरणातील आरोपीसोबत आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जलकुंभावर चढून आंदोलन केले. आरोपी वाल्मीक कराडला खून प्रकरणात सहआरोपी करून त्याच्यावर मोक्का लावावा ही त्यांची मागणी होती.
नाशिक जिल्ह्यातील द्वारका सर्कल येथे रविवारी रात्री टेम्पो आणि ट्रकची धडक होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. टेम्पोमध्ये 16 प्रवासी होते जे निफाड येथील एका धार्मिक कार्यक्रमातून परतत होते.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या १ महिना उलटूनही काही व्यक्तींवर कठोर कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. वाल्मिक कराडवर मोक्का न लावल्याने ग्रामस्थांनी १३ जानेवारीला टॉवर आंदोलन तर मकर संक्रांतीच्या दिवशी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्हा निसर्गरम्य सौंदर्यासाठी, ऐतिहासिक ठिकाणे आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे, थिबा पॅलेस, जयगड किल्ला, आरे-वारे आणि मांडवी समुद्रकिनारे ही काही ठिकाणे पर्यटकांना आवर्जून भेट द्यावीशी वाटतात.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आघाडी एकत्र राहणे हेच उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याला हत्येचा मास्टरमाइंड मानले जात असून, त्याच्यावर अद्याप मोक्का लावण्यात आलेला नाही.
Maharashtra