मनोज जरांगे पाटील यांचे 6 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण यशस्वी झाले आहे. सरकारने त्यांच्या चार प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जरांगे हे सातव्यांदा उपोषणाला बसले होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर, अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुंडे प्रकरणावर चर्चा केली.
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारी २०२५ रोजी सातव्यांदा उपोषण सुरू केले आहे. आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या या उपोषणात ते कुणबी प्रमाणपत्र, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी आणि शिंदे समितीला मुदतवाढ या मागण्यांसाठी आग्रही आहेत.
महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. या आजाराचा रविवारपर्यंत (26 जानेवारी) एकूण रुग्णांचा आकडा 101 वर पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय व्हेंटिलेटवर असणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील किवळा येथील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाने किवळा परिसर हाय अलर्ट झोन घोषित करून नियंत्रण उपाययोजना सुरू केल्या आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. महाराष्ट्रातील मारुती चितमपल्ली, चैत्राम पवार आणि डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती पुण्यात खालावली असून त्यांनी पुढील चार दिवसांचे दौरे रद्द केले आहेत. अस्वस्थतेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
कोल्हापुरात प्रसिद्ध वडापाव अनेक ठिकाणी मिळत असतो. त्या ठिकाणी राजा वडापाव, संतोष वडापाव आणि अण्णा वडापाव प्रसिद्ध आहेत.
पुण्यात सध्या एक दुर्मिळ आजार गुइलेन बॅरे सिंड्रोमने हाहाकार माजवला आहे. या आजारामध्ये व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे शरिरातील स्नायूंवर याचा परिणाम झाल्याचे दिसते. गंभीर स्थितीत लकवाही मारला जाऊ शकतो
महाराष्ट्रातील नागपूरजवळील एका दारुगोळा कारखान्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात किमान एका कामगाराचा मृत्यू झाला.
Maharashtra