भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्र अलर्टवर आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चे कौतुक केले आणि पाकिस्तानला सीमेत राहण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही उकसवणीचा मोठा परिणाम भोगावा लागेल, असे ते म्हणाले.
शेतीला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारने बहुचर्चित गोवा राज्य अमृतकाल कृषी धोरण, २०२५ लागू केले.
या मोहिमेतील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे ‘एलएमएस’ लॉईटरिंग म्युनिशन्स सिस्टम चा वापर, आणि हे स्वदेशी तंत्रज्ञान मिळालंय नागपूरमधून.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशस्वीतेबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. त्यांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि भारताला मिळालेल्या जागतिक पाठिंब्याचे कौतुक केले.
अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' राबवल्यानंतर श्रेयासाठी राजकारण सुरू झाले आहे. संजय राऊत यांनी लष्कराचे श्रेय सरकारने घेऊ नये, असे म्हटले आहे. सैनिकांच्या शौर्याचा वापर मतांसाठी होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे.
Sanjay Raut on Operation Sindoor : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांचे गड उधळून लावले आहेत.यावर खासदार संजय राऊत यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया देण्यासह केंद्रावरही टीका केली आहे.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या आधारभूत ठिकाणांवर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी एका सूचक पोस्टद्वारे पाकिस्तानला इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यात आले आहे. हे केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या कारवाईचे पाहलगाम हल्ल्यातील पीडित कौस्तुभ गणबोटे यांचे पुत्र कुणाल गणबोटे यांनी स्वागत केले आहे.ॉ
Maharashtra