शहापूर तालुक्यातील फुगाळे गावात एक ड्रोन डोंगरावर कोसळला. खेळणाऱ्या मुलांना ड्रोन सापडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक तपासात हा ड्रोन जलसंपदा विभागाच्या सर्वेक्षणासाठी वापरला जात असल्याचे समोर आले.
सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात एका नवविवाहित तरुणीचा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जनाकी कल्याण गळगुंडे (वय २२) असे तिचे नाव असून, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी छातीत दुखू लागल्याने तिचा मृत्यू झाला.
पुण्यातील एका तरुणाने वाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात रस्त्यावर झोपून अनोखा निषेध नोंदवला. त्याची कार टो केल्यानंतर त्याने हा निषेध केला. ही घटना वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया यावर चर्चा सुरू करण्यास भाग पाडते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या स्टँड अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
वर्धा जिल्ह्यातील ६८ वर्षीय इंदू सातपुते यांनी आपल्या नातवासोबत दहावीची परीक्षा ५१% गुणांसह उत्तीर्ण केली आहे. शिक्षणाची संधी न मिळालेल्या इंदू सातपुते यांनी 'सेकंड चान्स' उपक्रमाद्वारे शिक्षण पुन्हा सुरू केले आणि यश मिळवले.
पुण्यातील दत्तवाडी येथील एका व्हिडिओने पुणेकरांची झोप उडाली आहे. यात काही तरुण हातात कोयता नाचवत एका तरुणावर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेत हा तरुण जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, कोयता गॅंगवर अंकूश आणण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.
येत्या 9 जूनपासून विशेष पर्यटन ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
हिंदू विराट सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच त्यांच्या सभेल लॉरेन्स बिष्णोईचे फोटोही झळकले आहे.
पुणे जिल्ह्यात एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. ती नाईट शिफ्टला जात असताना हा प्रकार घडला. त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र सरकारने देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्काळ बंदी घातली आहे. नवीन धोरण येईपर्यंत सर्व व्यवहार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, केवळ न्यायालयीन आदेश किंवा अधिकृत मंजुरी असलेल्या जमिनींचेच दस्त स्वीकारले जातील.
Maharashtra