अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ३१ मे रोजी ते आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Puja Khedekar Case : पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. खेडकरने तपासात सहकार्य न केल्याचा पोलिसांचा दावा न्यायालयाने फेटाळला.
पुणे रेल्वे स्थानक आणि भोसरी परिसरात बॉम्ब असल्याचा फोन आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळांवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. या शिष्टमंडळांना 'टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी' म्हणत त्यांनी सरकारच्या अपयशाचे झाकण असल्याचा आरोप केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील चौसाळा जंगलात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहामागे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका निधी देशमुख यांनी पतीचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील वारजे आणि वडगाव शेरी येथे विजेचा धक्का लागून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुणे महानगरपालिकेने शहरातील विद्युत खांबांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे वैष्णवी हगवणे या तरुणीने हत्या केली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबीयांवर हुंडाबळी आणि छळाचे आरोप आहेत.
नागपूर पोलिसांनी मागील पाच महिन्यांत २ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत आणि २९२ जणांना अटक केली आहे. या कारवाईत रेव्ह पार्टी आयोजक, तस्कर आणि पुरवठादारांचा समावेश आहे.
डॉ. जयंत नारळीकर हे खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक होते. त्यांनी होईल-नारळीकर सिद्धांत मांडला आणि IUCAA ची स्थापना केली. त्यांचे कार्य विज्ञानप्रेमींसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
Kalyan Building Collapse : कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा परिसरातील सप्तश्रृंगी नावाची इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय.
Maharashtra