मुंबईतील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या कारवायांसाठी प्रसिद्ध असलेले दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे. ग्रामीण कर्नाटकातील सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या नायक यांनी धाडसी निर्णयांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पुण्यातील डी.पी. रोडवरील एका कॅफेसमोर कोयता गँगने दहशत माजवली. तिघा गुंडांनी गाड्यांची तोडफोड केली, मात्र पोलीस अद्याप निष्क्रिय आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना इशारा दिलाय. हाके यांनी म्हटले की, जरांगे उपोषणाला बसल्यास त्याच दिवशी मुंबई ते नांदेश पायी लाँग मार्च काढेन.
Pregnant Women Delivery on Road : जळगावात एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
17 वर्षीय मुलीने इमारतीच्या 45 व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथे घडली आहे. ही मुलगी गेल्या काही वर्षांपासून नैराश्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधी दाखल झाला आहे. यामुळे राज्यातील ठिकठिकाणी तुफान पावसाच्या सरी बरसताना दिसून येत आहेत. अशातच हवामान खात्याने काय अंदाज व्यक्त केलाय याबद्दल जाणून घेऊया.
CM Devendra Fadnavis on Sharad Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या कामाचे कौतूक केले आहे. याशिवाय त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टीही आवडतात असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
नागपूरमध्ये घरकाम करणाऱ्या एका तरुणीने मालकिणीच्या दोन हिऱ्यांच्या अंगठ्या चोरून पश्चिम बंगालमध्ये पळ काढला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
नाशिकमध्ये बहिणीला प्रपोज केल्याच्या संशयावरून तीन तरुणांनी १९ वर्षीय युवकाला बेदम मारहाण करून ठार मारले. सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिच्या पतीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोर्टात आरोपींच्या वकिलांनी वादग्रस्त दावे केले असून वैष्णवीच्या चारित्र्यावरही संशय व्यक्त केला आहे.
Maharashtra