बीडमध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली असून त्याने लिहिलेल्या पत्रात न्याय न मिळाल्याची व्यथा मांडली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नामांकित डॉक्टरला अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. डॉक्टरच्या ओळखीतील महिलेने कुटुंबियांसह मिळून हा कट रचला होता. पोलिसांनी तक्रार नोंदवून महिलेसह तिच्या कुटुंबियांना अटक केली आहे.
देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून, महाराष्ट्रात एका दिवसात ६५७ नवे रुग्ण आढळले आहेत. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याचे बहुतेक रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप झाल्याने त्यांनी मौन सोडले आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. निलेशची भूमिका आणि शशांकशी असलेले संबंध तपासले जात आहेत. वैष्णवीच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : महिलांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी देशभरात अनेक योजना सुरू आहेत. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अशीच एक योजना आहे. आता या योजनेत मोठी गडबड समोर आली आहे.
चाकण औद्योगिक परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोन १७ वर्षीय युवकांचा मृत्यू झाला. ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून, एका युवकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोनाच्या काळात रुग्णालयातील बेड रिकामा करण्यासाठी रुग्णाला मारुन टाका असे सांगणाऱ्या एका डॉक्टरची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संशयित शशांकने हत्येच्या एक दिवस आधी दोन १BHK फ्लॅट भाड्याने घेतल्याचे तपासात समोर आले आहे. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनावट पत्ता वापरल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यातील सिंहगड आजपासून पुढील तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे. खरंतर, गडावरील अतिक्रमण मोहीम हटवण्याचे काम या दिवसांमध्ये केले जाणार आहे. यामुळे पर्यटकांसाठी गड बंद असणार आहे.
Maharashtra