क्रिकेटच्या मैदानावर स्मृति मंधाना हिची बॅट धावांचा पाऊस पाडत आहे. त्याचबरोबर कमाईच्या बाबतीतही तिचा जोर दिसून येत आहे. दिवसेंदिवस तिची कमाई वाढतच चालली आहे.
मेघालय हनिमूनसारखी हत्या: फक्त १५ दिवसांचे लग्न आणि मग रक्ताने माखलेला हनिमून! महाराष्ट्रातील सांगलीत रात्रीच्या वेळी पत्नीने झोपलेल्या पतीवर कुऱ्हाडीने वार केले. कारण? लग्न टिकवण्याचा हट्ट! राजा रघुवंशी हत्याकांडानंतर आणखी एक भयानक वैवाहिक फसवणूक.
आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेकडून वारकऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. याचेच वेळापत्रक येथे जाणून घ्या.
छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध सिद्धार्थ नगर उद्यानात पावसामुळे भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे.
शरद पवार यांनी नगरमधील तरुण उद्योजक अफजल शेख यांच्या घरी अचानक भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ही भेट आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीचा भाग असल्याचे संकेत मिळत आहेत.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत 'मॅच फिक्सिंग'चे आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावत ते 'हास्यास्पद' आणि 'जनतेचा अपमान' असल्याचे म्हटले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती अंतर्गत लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
औरंगाबादमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सासऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर जावयाने पाच तास मृतदेह कारमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृताची मुलगी डॉक्टर असूनही मदत न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Maharashtra