Medha Kulkarni: खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुण्येश्वर मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथील अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला आहे. दर्गा ट्रस्टने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

पुणे: राज्यसभा खासदार आणि भाजप नेत्या डॉ. मेधा कुलकर्णी हनुमान जयंतीला पुण्येश्वर मंदिरात एका कार्यक्रमासाठी आल्या असताना येथील ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथील अजान रोखण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

याबाबत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष राहुल डंबाळे म्हणाले, की छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा परिसर अत्यंत संवेदनशिल आहे. पुण्याच्या खासदारांनी अशा पद्धतीने व्यक्त होणे चुकीचे आहे. आपण कट्टर असल्याचे दाखविण्यासाठी त्यांनी हे केले आहे. त्यांना केवळ वरिष्ठांची मर्जी राखायची असल्याने त्यांनी हे केले आहे.

डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. हनुमान जयंतीला पुण्येश्वर मंदिरात त्या आल्या असताना त्यांनी अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचे ट्रस्टने म्हटले आहे.