- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather LATEST update : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस; उत्तर महाराष्ट्रात कशी असेल हवामानस्थिती? सोमवारी राज्यात मिश्र वातावरण
Maharashtra Weather LATEST update : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस; उत्तर महाराष्ट्रात कशी असेल हवामानस्थिती? सोमवारी राज्यात मिश्र वातावरण
Maharashtra Weather LATEST update : राज्यात उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर कमी झाल्याने थंडी घटली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असून, मराठवाडा व विदर्भात मात्र निरभ्र आकाशामुळे उष्णता वाढणार आहे.

सोमवारी राज्यात मिश्र वातावरण
मुंबई: राज्यातील थंडीचे प्रमाण कमी होत असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर घटला आहे. परिणामी काही भागांत हलका पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सोमवारी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Light rainfall is very likely at isolated places in the districts of Konkan - Goa and South Madhya Maharashtra.
Mainly sunny weather condition very likely to prevail in the districts of North Madhya Maharashtra and Marathwada.— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 23, 2025
मुंबई आणि कोकणात ढगाळ वातावरण, हलक्या सरींचा अंदाज
मुंबई (24 नोव्हेंबर)
आकाश अंशतः ढगाळ
मेघगर्जनेसह हलका पाऊस शक्य
कमाल तापमान: 34°C
किमान तापमान: 23°C
कोकणातील स्थिती:
ठाणे, रायगड, रत्नागिरी: ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज
सिंधुदुर्ग: हलका ते मध्यम पाऊस, ढगांची गर्दी कायम
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
पुणे:
आकाश मुख्यतः निरभ्र
कमाल तापमान: 32°C
किमान तापमान: 14°C
सांगली, कोल्हापूर आणि घाटमाथा:
काही भागांत हलका पाऊस पडू शकतो
दुपारी गारवा कमी, हलकी उष्णता जाणवेल
मराठवाड्यात गारवा कमी – आकाश स्वच्छ
छत्रपती संभाजीनगर:
निरभ्र आकाश
कमाल तापमान: 33°C
किमान तापमान: 18°C
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने मराठवाड्यातील थंडीतही घट दिसतेय.
उत्तर महाराष्ट्रात वातावरण स्थिर पण गारवा कमी
नाशिक:
आकाश स्वच्छ
कमाल तापमान: 32°C
किमान तापमान: 17°C
थंडीत घट झाल्याने दुपारी उष्णतेचा प्रभाव काहीसा वाढलेला जाणवतो.
विदर्भात निरभ्र आकाश, दुपारी उन्हाचा तडाखा
नागपूर:
निरभ्र आकाश
कमाल तापमान: 30°C
किमान तापमान: 14°C
विदर्भातही गारवा कमी होत असून दुपारी कडक उन्हामुळे उष्णतेची तीव्रता जाणवत आहे.
पुढील दोन-तीन दिवस राज्यात मिश्र हवामान कायम
राज्यात सध्या हवामानात चढउतार सुरू असून अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी गारवा कमी होऊन उष्णतेचा तडाखा वाढलेला आहे. अशीच मिश्र स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे आणि हवामानाचा अंदाज लक्षात ठेवून बाहेर पडणे उचित ठरेल.

