MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात कुठे पावसाचा तडाखा तर कुठे उन्हाचा चटका! जाणून घ्या उद्याची स्थिती

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात कुठे पावसाचा तडाखा तर कुठे उन्हाचा चटका! जाणून घ्या उद्याची स्थिती

Maharashtra Weather Update: महाराष्ट्राच्या हवामानात मोठी उलथापालथ अपेक्षित असून, विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याउलट, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि तीव्र उकाडा जाणवणार आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 26 2026, 09:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
महाराष्ट्रात कुठे पावसाचा तडाखा तर कुठे उन्हाचा चटका!
Image Credit : our own

महाराष्ट्रात कुठे पावसाचा तडाखा तर कुठे उन्हाचा चटका!

मुंबई: महाराष्ट्राच्या हवामानात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. उद्या, शुक्रवार २७ मार्च रोजी, राज्यावर 'दुहेरी संकट' ओढावण्याची शक्यता आहे. एका बाजूला विदर्भावर अवकाळी पावसाचे सावट आहे, तर दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्र उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघणार आहे. विभागांनुसार हवामानाचा सविस्तर अंदाज खालीलप्रमाणे आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
१. विदर्भ: वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Image Credit : freepik

१. विदर्भ: वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

प्रभावित जिल्हे: नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली.

स्थिती: या भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना: काढणीला आलेल्या पिकांनी सुरक्षित जागी साठवणूक करावी, जेणेकरून नुकसान टाळता येईल. अमरावती, वाशीम आणि अकोल्यात मात्र उष्णता कायम राहील. 

Related Articles

Related image1
Digital Harassment: आता 'इनबॉक्स'मध्ये छेडछाड केली तर थेट जेल! महाराष्ट्रात नवा 'शक्ती' कायदा मंजूर; वाचा काय आहेत नियम
Related image2
Nagpur Ram Navami: नागपूर दुमदुमले! पोद्दारेश्वर राम मंदिरात फडणवीसांनी ओढला प्रभू श्रीरामाचा रथ; पाहा भक्तीचा महासागर
36
२. कोकण: उकाड्याने अंगाची लाहीलाही
Image Credit : our own

२. कोकण: उकाड्याने अंगाची लाहीलाही

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेसोबतच आर्द्रतेचे (Humidity) प्रमाण जास्त असल्याने नागरिक घामाघूम होतील.

भाग: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर.

तापमान: मुंबईत कमाल तापमान ३२-३६°C दरम्यान राहील. दमट हवेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उकाडा अधिक तीव्र जाणवेल. 

46
३. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र: उष्णतेची लाट
Image Credit : our own

३. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र: उष्णतेची लाट

या दोन्ही विभागांत कोरडे हवामान असून उन्हाचा कडाका वाढणार आहे.

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेडसह सर्व जिल्ह्यांत पारा ३७°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र: नाशिक, जळगाव, धुळे परिसरात तापमानात वाढ होऊन नागरिकांना चटके सोसावे लागतील. 

56
४. पश्चिम महाराष्ट्र: कोरडे हवामान
Image Credit : PTI

४. पश्चिम महाराष्ट्र: कोरडे हवामान

पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये पावसाची शक्यता नसली तरी उष्णता वाढलेली असेल. पुण्याचे किमान तापमान १८-२१°C तर कमाल तापमान ३३-३६°C च्या आसपास राहील. 

66
आरोग्य सल्ला
Image Credit : our own

आरोग्य सल्ला

वाढत्या उष्णतेमुळे आणि बदलत्या हवामानामुळे डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
Digital Harassment: आता 'इनबॉक्स'मध्ये छेडछाड केली तर थेट जेल! महाराष्ट्रात नवा 'शक्ती' कायदा मंजूर; वाचा काय आहेत नियम
Recommended image2
Nagpur Ram Navami: नागपूर दुमदुमले! पोद्दारेश्वर राम मंदिरात फडणवीसांनी ओढला प्रभू श्रीरामाचा रथ; पाहा भक्तीचा महासागर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved