MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला पावसापासून दिलासा, पण अजूनही धोका कायम; 3 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला पावसापासून दिलासा, पण अजूनही धोका कायम; 3 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ५ ऑक्टोबरला हवामान बदलणार असून, पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा असून विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 04 2025, 10:33 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
Image Credit : Asianet News

पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता

मुंबई: 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात बदल पाहायला मिळणार आहेत. काही भागांत आता पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली असली तरी, अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/fj5OWDnVes

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 4, 2025 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
राज्यात कुठे कसा राहणार पाऊस?
Image Credit : ANI

राज्यात कुठे कसा राहणार पाऊस?

हवामान विभागानुसार, 5 ऑक्टोबर रोजी राज्यभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana: ई-KYC करताना OTP चा त्रास? अदिती तटकरे यांनी दिलं स्पष्टीकरण!, नेमकं काय म्हणाल्या?
Related image2
Cyclone Shakhti: चक्रीवादळ ‘शक्ती’ महाराष्ट्राच्या दिशेनं! हवामान खात्याचा अलर्ट, कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?
38
मुंबई आणि कोकण
Image Credit : Getty

मुंबई आणि कोकण

मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही असाच पाऊस होऊ शकतो. 

48
पश्चिम महाराष्ट्र
Image Credit : Getty

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. घाटमाथा भागात मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील. 

58
मराठवाडा
Image Credit : Getty

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे. काही ठिकाणी वादळी वारे देखील होण्याची शक्यता आहे. 

68
उत्तर महाराष्ट्र
Image Credit : X

उत्तर महाराष्ट्र

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये हलक्याच पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि घाटमाथ्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 

78
विदर्भ – 3 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
Image Credit : X

विदर्भ – 3 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण राहील. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. 

मात्र चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसोबत पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान विभागाने येथे "यलो अलर्ट" जारी केला आहे. नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी. 

88
शेतकऱ्यांसाठी सूचना
Image Credit : ANI

शेतकऱ्यांसाठी सूचना

राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही हवामान अस्थिर आहे. त्यामुळे शेती कामे करताना किंवा प्रवास करताना हवामान विभागाच्या सूचना आणि अलर्टकडे लक्ष द्यावे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Board Supplementary Exam 2026 : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 16 जूनपासून परीक्षांना होणार सुरुवात
Recommended image2
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; RCC संस्थापकाला CBI कडून अटक, लातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
Recommended image3
उद्धव ठाकरेंचा हा खासदार शिंदे गटाला मिळणार, नाव ऐकून म्हणाल हे कस झालं?
Recommended image4
बैल कापला तर आम्ही, संग्राम जगताप यांनी दिला मोठा इशारा
Recommended image5
ST Bus Fare Hike : डिझेल दरवाढीचा ST महामंडळाला फटका; बसभाडे वाढीचे संकेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: ई-KYC करताना OTP चा त्रास? अदिती तटकरे यांनी दिलं स्पष्टीकरण!, नेमकं काय म्हणाल्या?
Recommended image2
Cyclone Shakhti: चक्रीवादळ ‘शक्ती’ महाराष्ट्राच्या दिशेनं! हवामान खात्याचा अलर्ट, कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved