जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच धो-धो पाऊस कोसळला गेला. यानंतर आता पावसाचा एकही थेंब बहुतांश ठिकाणी नाही. उकाड्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासोबत शेतकरीही पावसाकडे लक्ष लावून बसल आहे. अशातच पुन्हा एकदा पावसाच्या सरी कधी बसरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : राज्यातील पावसाने सध्या विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मात्र पुढील पाच ते सहा दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मोठ्या पावसाची शक्यता फार कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. पण जोरदार पावसाच्या सरी बरसणार नसल्याचेही आयएमडीने म्हटले आहे.

पुढील काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता नाही
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवार आणि गुरुवारी राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र या पावसाचा शेती, जलसाठे किंवा धरणांच्या पाणीसाठ्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत उकाडा आणि दमट हवामान जाणवू शकते.
20 जुलैनंतर हवामानात बदलाचे संकेत
हवामान तज्ज्ञांच्या मते, 20 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सूनसाठी पोषक हवामान तयार होऊ शकते. यासोबत आणि राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढला जाऊ शकतो.
विदर्भात पावसाची शक्यता अधिक
कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाच्या दिशेने सक्रिय झाल्यास त्या भागात तुलनेने अधिक पावसाची शक्यता आहे. पण मराठवाड्यात कमी दाबाचा प्रभाव मर्यादित राहण्याची शक्यता असल्याने तेथे पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.
जुलैच्या सुरुवातीसारखा मुसळधार पाऊस नाही
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलैनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे राज्यभर अतिवृष्टीचे चित्र सध्या दिसत नसल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
राज्यातील अनेक भागांत खरीप पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे. पेरणीनंतर पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 20 जुलैनंतर अपेक्षित हवामान बदलाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


