MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुंबईत आज मुसळधार सरी

Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुंबईत आज मुसळधार सरी

Maharashtra Rain : राज्यात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज (16 सप्टेंबर) हलका ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, पुणे घाटमाथाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 16 2025, 09:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
बंगाल अरबी समुद्रातील कमी दाबामुळे पावसाचा जोर
Image Credit : ANI

बंगाल- अरबी समुद्रातील कमी दाबामुळे पावसाचा जोर

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागानुसार यंदा नवरात्र, दसरा आणि दिवाळीसुद्धा पावसाळ्यातच जाण्याची शक्यता आहे. 14 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर आज (16 सप्टेंबर) तिसऱ्या दिवशीही कायम आहे.

27
मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस
Image Credit : Getty

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस

मुंबईत सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू असून ढगाळ वातावरण कायम आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, सूर्याचे दर्शन होण्याची शक्यता कमी आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचं धुमशान! पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट
Related image2
मुंबईतील St. Xavier's College मध्ये Smart Solar Bench, 100 मोबाईल फोन किंवा लॅपटॉपला इंटरनेटशी जोडण्याची क्षमता
37
ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी
Image Credit : X

ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

रायगड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसह पुणे घाटमाथ्याच्या भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

47
कोकण विभागात हलका ते मध्यम पाऊस
Image Credit : X

कोकण विभागात हलका ते मध्यम पाऊस

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जना होऊ शकते.

57
मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
Image Credit : ANI

मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण

पुणे, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस व हलक्या सरींचा अंदाज आहे. कमाल तापमान 27 ते 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 ते 25 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील.

67
विदर्भ व मराठवाड्यातही पावसाची शक्यता
Image Credit : ANI

विदर्भ व मराठवाड्यातही पावसाची शक्यता

नागपूर, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि ओतूर जिल्ह्यांत हलका पाऊस व ढगाळ वातावरण राहील.

77
देशभरातील हवामान स्थिती
Image Credit : ANI

देशभरातील हवामान स्थिती

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये मान्सून पूर्णपणे परतणार नसून पुढील दोन दिवस पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगालसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra HSC Result 2026 : आज दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल? घ्या जाणून
Recommended image2
Maharashtra Weather : मुंबईसह राज्यात उष्णतेचा इशारा; हवामान खात्याकडून 5 मेपर्यंत अलर्ट कायम
Recommended image3
Viral Wedding Card: अमरावतीच्या लग्नपत्रिकेने नवा वाद, टिपू सुलतान-शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने चर्चांना उधाण!
Recommended image4
Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आजपासून 'मिसिंग लिंक' सुरू, जाणून घ्या प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती
Recommended image5
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान, बिनविरोध निवडीची शक्यता
Related Stories
Recommended image1
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचं धुमशान! पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट
Recommended image2
मुंबईतील St. Xavier's College मध्ये Smart Solar Bench, 100 मोबाईल फोन किंवा लॅपटॉपला इंटरनेटशी जोडण्याची क्षमता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved