- Home
- Maharashtra
- तळीरामांसाठी खूशखबर! ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत 'चिअर्स' करण्याची मुभा; राज्य सरकारकडून मद्यविक्रीच्या वेळेत मोठी वाढ!
तळीरामांसाठी खूशखबर! ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत 'चिअर्स' करण्याची मुभा; राज्य सरकारकडून मद्यविक्रीच्या वेळेत मोठी वाढ!
Liquor Shop Timings For New Year In Maharashtra : नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सरकारने मद्यविक्रीच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. २४, २५, ३१ डिसेंबरला दारूची दुकाने, पब, बार यांना रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिलीय.

चिअर्स! मद्यप्रेमींसाठी दिलासादायक बातमी
मुंबई : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने दारूची दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गृह विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
दरवर्षी या काळात मद्यविक्रीत मोठी वाढ होते. हे लक्षात घेऊन सरकारने 24, 25 आणि 31 डिसेंबर या तीन दिवसांसाठी विशेष सवलत दिली आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे राहणार आहे.
दारू विक्रीच्या वेळेत काय बदल?
गृह विभागाच्या आदेशानुसार
बीअर व वाईन विक्री करणारी दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार
FLBR-II परवानाधारक दुकानांनाही हीच सवलत
पब आणि बार यांना पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यविक्रीची परवानगी
विविध परवान्यांसाठी वेळेची सविस्तर माहिती
FL-3 (परवाना कक्ष) आणि FL-4 (क्लब परवाना)
पोलीस आयुक्तालय हद्दीत: रात्री 1.30 ते पहाटे 5
आयुक्तालयाबाहेर: रात्री 11.30 ते पहाटे 5
नमुना ‘ई’ (बीअर बार) व ई-2 परवाना
रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत विक्रीस परवानगी
नववर्षाच्या स्वागतासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
24, 25 डिसेंबर आणि थर्टी फस्टच्या निमित्ताने राज्यभर उत्साहाचे वातावरण असते. मात्र, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.
31 डिसेंबरला चोख पोलीस बंदोबस्त
अवैध दारू विक्रीवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथके
रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी
अनधिकृत ढाबे व फार्महाऊसवर छापे
वाहतूक पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विशेष मोहीम
सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, महिलांशी गैरवर्तन, अवैध मद्य व अंमली पदार्थ विक्री किंवा सेवन यावर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

