MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात बुधवारी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!, 29 जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात बुधवारी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा!, 29 जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने २९ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांसाठी यलो, ऑरेंज अलर्ट जारी केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 28 2025, 09:55 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता
Image Credit : ANI

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचे आणि उकाड्याचे संमिश्र वातावरण दिसत असताना, 29 ऑक्टोबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Thunderstorm accompanied with lightning, heavy rainfall, gusty winds with speed reaching 40-50 Kmph very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa, South Madhya Maharashtra , Marathwada .

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 28, 2025

27
कोकण विभागात वादळी पावसाचा इशारा
Image Credit : social media

कोकण विभागात वादळी पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. विजांचा कडकडाट आणि गडगडाट यासह या सर्व भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Related Articles

Related image1
Pune Water Cut: गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या का आणि कुठल्या भागात?
Related image2
IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीसांचा मोठा निर्णय
37
पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस
Image Credit : Getty

पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस

पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, तर घाटमाथा परिसरात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होऊ शकतो. 

47
मराठवाड्यात वीज आणि पावसाचा डबल इशारा
Image Credit : Getty

मराठवाड्यात वीज आणि पावसाचा डबल इशारा

छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे हलका ते मध्यम पाऊस, तर जालना, परभणी आणि हिंगोली येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

57
उत्तर महाराष्ट्रात ढगांचा जोर
Image Credit : ANI

उत्तर महाराष्ट्रात ढगांचा जोर

धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, तर नाशिक व घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्व ठिकाणी यलो अलर्ट लागू आहे. 

67
विदर्भात सर्वाधिक सतर्कता
Image Credit : Asianet News

विदर्भात सर्वाधिक सतर्कता

अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि भंडारा येथे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 

77
नागरिकांसाठी सूचना
Image Credit : ANI

नागरिकांसाठी सूचना

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, तसेच अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
नाशिक बातम्या
विदर्भातील बातम्या
कोल्हापूर बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image2
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image3
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image4
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Recommended image5
IT प्रोफेशनलची चांदी! हिंजवडी ते मुंबई थेट 'शिवनेरी' धावणार; प्रवासाचा एक तास वाचणार, पाहा नवा प्लॅन
Related Stories
Recommended image1
Pune Water Cut: गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या का आणि कुठल्या भागात?
Recommended image2
IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीसांचा मोठा निर्णय
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved