- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather LATEST update : महाराष्ट्रात थंडीचा तडाका! शीतलहरीचं मोठं आक्रमण, 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather LATEST update : महाराष्ट्रात थंडीचा तडाका! शीतलहरीचं मोठं आक्रमण, 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather LATEST update : राज्यात थंडीचा कडाका वाढत असून, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली. हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांना शीतलहरीचा Cold Wave यलो अलर्ट जारी केला. पुणे, नाशकात तापमान लक्षणीय घसरले.

महाराष्ट्रात थंडीचा तडाका!
Maharashtra Weather Update: नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. मात्र आता हवामानात आणखी बदल होत असून, राज्यात थंडीचा कडाका झपाट्याने वाढत आहे. उत्तरेकडून येणारे थंड हवेचे प्रवाह सतत सक्रिय असल्याने काही भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत सर्वाधिक थंडीची नोंद होत आहे. हवामान खात्याने 8 जिल्ह्यांना शीतलहरी (Cold Wave) चा इशारा दिला आहे. पाहूया, 18 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात तापमान आणि हवामान कसं राहणार?
मुंबई व कोकण – गारव्यात वाढ
मुंबईत 18 नोव्हेंबर रोजी निरभ्र आकाश राहणार असून,
कमाल तापमान: 33°C
किमान तापमान: 19°C
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही आकाश स्वच्छ असून सकाळ–संध्याकाळी हलका गारवा वाढत आहे.
पश्चिम महाराष्ट्र – पुण्यात किमान तापमानात मोठी घट
पुण्यातही मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज आहे.
कमाल तापमान: 30°C
किमान तापमान: 11°C
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतही हवामान स्वच्छ असून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – सलग शीतलहरीचा धोका
छत्रपती संभाजीनगरमध्येही आकाश स्वच्छ राहणार आहे.
कमाल तापमान: 30°C
किमान तापमान: 13°C
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांत 18 नोव्हेंबर रोजी शीतलहरीचा इशारा जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र – तापमान एक अंकी पातळीजवळ
नाशिकमध्येही थंडीचे प्रमाण लक्षणीय वाढले असून शीतलहरी जारी आहे.
कमाल तापमान: 30°C
किमान तापमान: 10°C
धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतही तापमानात घट होत असून शीतलहरीचा इशारा आहे.
विदर्भ – नागपुरात गारवा कायम
नागपूरमध्ये 18 नोव्हेंबर रोजी
कमाल तापमान: 27°C
किमान तापमान: 12°C
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत तापमानात सतत घट होत आहे. इतर जिल्ह्यांतही सकाळ–रात्री गारवा वाढणार आहे.
8 जिल्ह्यांना शीतलहरीचा यलो अलर्ट
हवामान खात्याने खालील 8 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
धुळे
नाशिक
जळगाव
छत्रपती संभाजीनगर
जालना
परभणी
बीड
हिंगोली
थंडीपासून बचावासाठी गरम कपड्यांचा वापर, विशेषतः पहाटे व रात्री काळजी घेणे, लहान मुले व वृद्धांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

