हवामान विभागाने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागात अजूनही पाऊस न झाल्यामुळं शेतकऱ्यावर दुबार पेरणीच संकट आलं आहे. हवामान विभागानं आजचा पावसाचा अंदाज सांगितला आहे. घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात मुसळधार पाऊस पडणार 

कोकण विभागात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस असल्यानं तिथं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं अवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पुणे घाटमाथा परिसरात चांगला पाऊस होणार 

पुणे घाटमाथा परिसरात चांगला पाऊस होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. कोल्हापूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान खात्यानं वर्तवला आहे.