पोर्शे अपघात ताजा असतानाच शिरूरमध्ये पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात पिकअप, धडक बसल्याने एक ठार

| Published : Jun 01 2024, 12:53 PM IST / Updated: Jun 01 2024, 01:00 PM IST

Shirur Minor Girls Tempo Hit Bike Rider
पोर्शे अपघात ताजा असतानाच शिरूरमध्ये पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात पिकअप, धडक बसल्याने एक ठार
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षांच्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

 

पुण्यात दोन आठवड्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार पोर्शे चालवत दोघांना उडवलं. पुण्यातील हे प्रकरण सध्या तापलेलं असतानाच शिरुर तालुक्यातही पोर्श पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली आहे. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षांच्या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होतो की त्या मालवाहू पिकअप ट्रकने बाईकसकट त्या चालकाला 20 ते 30 फुटांपर्यंत फरपटत नेले. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

कसा झाला अपघात?

हा अपघात घडला तेव्हा शिरूर तालुक्यातील अरणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी ( वय अंदाजे 15) ही पिकअप वाहन चालवत होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरच तिच्या शेजारील सीटवर पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. मात्र अचानक तिच्या मालवाहू टेम्पोची एका बाईकला धडक बसली आणि बाईकसकट चालकही बराच दूरपर्यंत फरपटत गेला. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा अपघातानंतर तो पोलीस पाटील आणि त्याची मुलगी हे दोघेही मदतीसाठी आलेच नाहीत. उलट मालवाहू टेम्पो तिथेच घटनास्थळ सोडून त्यांनी तेथून पळ काढला. या घटनेत अरुण मेमाणे याचा मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे.

याप्रकरणी मयत अरुण मेमाणे यांचा भाऊ सतिश मेमाणे याने शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलीचे वडील अरणगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांच्यासह टेम्पो चालवणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे. शिक्रापूर पोलीस या गुन्ह्याच्या अधिक तपास करत आहेत.

आणखी वाचा:

Pune porsche Accident : पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक, ब्लड सॅम्पल प्रकरणात हात असल्याचा संशय