MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Health Care : महिलांनी उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी घरच्याघरी करा ही ५ योगासने

Health Care : महिलांनी उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी घरच्याघरी करा ही ५ योगासने

Health Care : आजकाल महिलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तणाव, चुकीचा आहार आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे ही समस्या गंभीर होऊ शकते. मात्र काही सोपी योगासने नियमित केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 14 2026, 09:45 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
योगासनांचा फायदा
Image Credit : Getty

योगासनांचा फायदा

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांना High Blood Pressure म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास होताना दिसतो. तणाव, अपुरी झोप, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. मात्र दररोज काही मिनिटे योगाभ्यास केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. योगामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत राहते आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
वज्रासन (Vajrasana)
Image Credit : Freepik

वज्रासन (Vajrasana)

वज्रासन हे जेवणानंतरही करता येणारे एकमेव योगासन आहे. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील तणाव कमी होतो. जमिनीवर गुडघे टेकवून बसावे आणि हात गुडघ्यांवर ठेवावेत. काही मिनिटे शांतपणे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे मन शांत राहते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Related Articles

Related image1
Health Tips: फिल्टरचं पाणी प्यायल्याने किडनी खराब होते का? डॉक्टरांचे मत काय?
Related image2
Fatty Liver Yoga : फॅटी लिव्हरच्या समस्येवर करा ही योगासने, मिळेल आराम
37
ताडासन (Tadasana)
Image Credit : Gemini AI

ताडासन (Tadasana)

ताडासन हे अत्यंत सोपे आणि प्रभावी योगासन मानले जाते. हे आसन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि तणाव कमी होतो. ताडासन करण्यासाठी सरळ उभे राहून हात वर करून शरीर ताणून धरा. काही सेकंद ही स्थिती कायम ठेवल्यानंतर हळूहळू सामान्य स्थितीत या. नियमित ताडासन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

47
भुजंगासन (Bhujangasana)
Image Credit : freepik

भुजंगासन (Bhujangasana)

भुजंगासनामुळे छाती आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. तसेच शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. पोटावर झोपून हातांच्या आधाराने शरीराचा पुढील भाग वर उचलावा. काही सेकंद ही स्थिती ठेवून पुन्हा खाली यावे. या आसनामुळे तणाव कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.

57
शवासन (Shavasana)
Image Credit : freepik

शवासन (Shavasana)

शवासन हे मन आणि शरीराला पूर्ण विश्रांती देणारे योगासन आहे. जमिनीवर सरळ झोपून डोळे बंद करून शरीर सैल सोडावे. काही मिनिटे शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करावे. यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते.

67
प्राणायाम (Pranayama)
Image Credit : our own

प्राणायाम (Pranayama)

प्राणायाम हा योगाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खोल श्वास घेणे आणि सोडणे यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. यामुळे तणाव कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. रोज सकाळी 10 ते 15 मिनिटे प्राणायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात.

77
नियमित योगाचे फायदे
Image Credit : Getty

नियमित योगाचे फायदे

योगाचा नियमित सराव केल्यास केवळ रक्तदाबच नाही तर संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते. शरीर लवचिक राहते, तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. त्यामुळे महिलांनी रोज काही मिनिटे योगासाठी काढणे अत्यंत गरजेचे आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Gold Mangalsutra: १ लाखापेक्षा कमी किमतीत मिळणारे सोन्याचे मंगळसूत्र
Recommended image2
Balcony Garden Decor : झेंडूची फुलं ते फेयरी लाईट्स, बाल्कनी सजवण्याच्या ७ भन्नाट आयडिया
Recommended image3
Navratri 2026 Day 4 : नवरात्रीचा चौथा दिवस, जाणून घ्या माँ कुष्मांडाची पूजा आणि रॉयल ब्लू रंगाचे महत्त्व
Recommended image4
Bengali Sarees : दुर्गा पूजेसाठी खरेदी करा या ७ सुंदर बंगाली साड्या
Recommended image5
Horoscope 14th October 2026 : मेष ते मीन राशींसाठी १४ ऑक्टोबरचा दिवस कसा असेल? जाणून घ्या
Related Stories
Recommended image1
Health Tips: फिल्टरचं पाणी प्यायल्याने किडनी खराब होते का? डॉक्टरांचे मत काय?
Recommended image2
Fatty Liver Yoga : फॅटी लिव्हरच्या समस्येवर करा ही योगासने, मिळेल आराम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved