सार

मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर कसा परिणाम होतो? आणि या दरम्यान महिलांनी जीवनशैली संतुलित ठेवण्यासाठी कोणती काळजी घेणे गरजेची आहे, या विषयी जाणून जाणून घेऊया.

मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पा मानला जातो. यामुळे स्त्रियांमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल दिसून येतात. यादरम्यान जीवनशैली संतुलित ठेवण्यासाठी मेहनतीची आणि सहकार्याची गरज अधिक भासते. मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर कसा परिणाम होतो? आणि या दरम्यान महिलांनी जीवनशैली संतुलित ठेवण्यासाठी कोणती काळजी घेणे गरजेची आहे,जाणून घेऊया.

मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉज म्हणजे काय?

मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे. प्रत्येक स्त्रीला आयुष्याच्या एका टप्प्यानंतर मेनोपॉजला सामोरे जावे लागते. मेनोपॉज येण्यापूर्वीचा टप्पा म्हणजे पेरीमेनोपॉज होय. पेरीमेनोपॉजदरम्यान महिलांना मासिक पाळी अनियमित येते, पण पूर्णपणे बंद होत नाही. वयाच्या ३५-४० व्या वर्षी महिलांमध्ये पेरीमेनोपॉजची लक्षणे दिसून येतात..

मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा शरीरावर कसा परिणाम होतो?

मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजमुळे महिलांसमोर अनेक आव्हाने येतात. जसे की मूड बदलणे, झोपेचा त्रास जाणवणे, वजन वाढणे, थकवा जाणवणे, स्मरणशक्ती कमी होणे, अनियमित मासिक पाळी इत्यादी लक्षणे स्त्रियांच्या जीवनशैली आणि आरोग्यावर परिणाम करू शकतात.

जीवनशैली संतुलित ठेवण्यासाठी काही उपाय

नियमित व्यायाम करा

संतुलित आहार घ्या. हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार घेणे गरजेचे आहे.

या दरम्यान तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही हार्मोन थेरेपी करू शकता.

पूर्ण झोप घ्या. झोपेचे वेळापत्रक ठरवा.

भरपूर पाणी प्या.

योनीमार्ग स्वच्छ ठेवा

मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपाय :

कोणतेही काम करताना अतिरेक करू नका. काम आणि वैयक्तिक गोष्टी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा.

मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजच्या लक्षणांबद्दल संवाद साधा.

विश्रांती घ्या, छंद जोपासा, नियमित व्यायाम करा आणि प्रियजनांना वेळ द्या.

प्रत्येक वेळी हो म्हणणे गरजेचे नाही आणि आवश्यक असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही मर्यादेत पाहा.