भारतीयांना दिलासा वर्षातील पहिले सूर्यग्रहण पाहता येणार ; या ठिकाणी पाहता येणार लाईव्ह ,जाणून घ्या

| Published : Apr 07 2024, 09:23 AM IST

solar eclipse
भारतीयांना दिलासा वर्षातील पहिले सूर्यग्रहण पाहता येणार ; या ठिकाणी पाहता येणार लाईव्ह ,जाणून घ्या
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

वर्षातील पहिले सूर्य ग्रहण उद्या होणार असून, मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. कारण भारतात त्या वेळी रात्र असणार आहे. मात्र हे सूर्य ग्रहण भारतीयांना लाईव्ह पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या कुठे आणि कोणत्या ठिकाणी लाईव्ह असणार आहे.

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे अनेकांना हे बघायचं असतं. यंदा वर्षातील पाहिलं सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी विशेष मानले जाते कारण सूर्यग्रहण दरम्यान आकाशात एक अद्भुत दृश्य पाहायला मिळणार आहे. यावेळी चंद्राच्या विशेष स्थितीमुळे हे गेल्या ५ दशकांतील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल.जे लोक ग्रहण प्रभावित भागात राहत नाहीत त्यांना हे ग्रहण कसे दिसेल? जाणून घ्या.

किती वाजता दिसणार सूर्यग्रहण?

वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार ८ एप्रिल रोजी रात्री ९.१२ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १.२५ वाजता संपेल. त्यावेळी भारतात रात्र असेल. मात्र या ग्रहणाचा प्रभाव अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडाच्या विविध भागात काही तास दिसणार आहे.

हे सूर्यग्रहण कुठे दिसणार?

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने म्हटले आहे की ८ एप्रिल २०२४ रोजी संपूर्ण सूर्यग्रहण मेक्सिको, यूएसए आणि कॅनडातून उत्तर अमेरिकेतून जाईल. दरम्यान, हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक मेक्सिको, उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, कॅनडा, इंग्लंडचा उत्तर पश्चिम प्रदेश आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे. ते भारतात दिसणार नाही. असे सूर्यग्रहण १९७१ साली दिसल्याचे बोलले जात आहे.

'इथे' बघा ग्रहण लाईव्ह :

हे सूर्यग्रहण अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या वेबसाइटवर लाईव्ह दाखवले जाणार आहे. याशिवाय तुम्ही नासाच्या यूट्यूब चॅनलवरही हे ग्रहण पाहू शकता. हे लाइव्ह स्ट्रिमिंग ८ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ९ एप्रिल रोजी सकाळी १.३० पर्यंत होईल. या काळात ग्रहण वेगवेगळ्या ठिकाणांहून दाखवले जाईल. याशिवाय नासाच्या तज्ज्ञांचे संभाषणही तुम्हाला पाहता येईल.

भारतात ग्रहण दिसणार नाही :

यंदाचे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. कारण भारतात त्याकाळात रात्र असणार आहे. त्यामुळे भारतात कोणत्याही प्रकारचा सुतककाळ पाळण्याची गरज नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

पूर्ण सूर्यग्रहणाचे महत्त्व :

वैज्ञानिकांनुसार, वर्षातून एकदा किंवा दोनवेळेस सूर्यग्रहण असते. खरंतर ही खगोलीय घटना आहे. पण पूर्ण सूर्यग्रहण काही वर्षांतून एकदा असते. पूर्ण सूर्यग्रहणावेळी चंद्र पृथ्वीच्या फार जवळ येतो. यामुळे चंद्राचा आकार मोठा दिसतो आणि सूर्य पूर्णपणे झाकला जातो. याआधी पूर्ण सूर्यग्रहण 2017 दिसले होते. वैज्ञानिकांनुसार, यंदाचे सूर्यग्रहण 50 वर्षातील सर्वाधिक मोठे सूर्यग्रहण असणार आहे.

आणखी वाचा :

Surya Grahan 2024 : 50 वर्षातील सर्वाधिक मोठे सूर्यग्रहण या तारखेला असणार, भारतात दिसणार का ?

Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्यासाठी अंगणात काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाइन