सार

धावपळीच्या जीवनात तरुण त्वचा टिकवण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली महत्त्वाची आहे. अँटिऑक्सिडंटयुक्त फळे, प्रथिने, हेल्दी फॅट्स आणि हायड्रेशन आवश्यक आहेत. साखर, तेलकट पदार्थ, धूम्रपान आणि तणाव टाळा.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लवकर वृद्ध दिसणे ही सामान्य समस्या झाली आहे. सततचा तणाव, असंतुलित आहार आणि अनियमित झोप यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात आणि त्वचेचा नैसर्गिक चमकही कमी होतो. मात्र, योग्य आहार घेतल्यास आणि चांगल्या सवयी अंगीकारल्यास शरीर दीर्घकाळ तरुण राहू शकते. 

हे पदार्थ ठेवा आहारात:

अँटिऑक्सिडंटयुक्त फळे आणि भाज्या: संत्री, डाळिंब, गाजर आणि पालक यामुळे त्वचा उजळ आणि तजेलदार राहते. 

प्रथिनयुक्त पदार्थ: डाळी, अंडी, आणि दही यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि सुरकुत्या उशिरा येतात. 

हेल्दी फॅट्स: बदाम, अक्रोड, आणि ऑलिव्ह ऑइल यामुळे त्वचा मऊ आणि लवचिक राहते. 

हळद आणि आले: हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहेत, जे शरीरातले विषारी घटक बाहेर टाकतात. 

भरपूर पाणी: दिवसाला किमान २.५-३ लिटर पाणी प्यायल्याने त्वचेला हायड्रेशन मिळते. या गोष्टी टाळा:

  • जास्त साखर आणि पॅकेज्ड फूड टाळा. 
  • अधिक तेलकट आणि मैद्याचे पदार्थ खाऊ नका. 
  • अल्कोहोल आणि धूम्रपान टाळल्यास त्वचेचे आरोग्य चांगले राहते. 

योग्य आहारासोबत जीवनशैलीत हे बदला:

  • नियमित व्यायाम आणि योगा करा. 
  • पुरेशी झोप घ्या आणि तणाव टाळा. 
  • नैसर्गिक उपायांचा अवलंब करा.